अल्पवयीन मित्रांनी आपल्याच मित्रावर केला हल्ला, बेदम मारहाणीमुळे गेला जीव

अल्पवयीन मित्रांनी आपल्याच मित्रावर केला हल्ला, बेदम मारहाणीमुळे गेला जीव

अल्पवयीन मित्रांनीच प्राणघातक हल्ला करत डोक्यात, डोळयाजवळ, तोंडावर नाकातोडातून रक्त येईपर्यंत मारहाण केली.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 07 एप्रिल : पिंपरी चिंचवडमध्ये  (pimpri chinchwad) गुन्हेगारी घटनांचे सत्र सुरूच आहे. जुन्या वादातून अल्पवयीन मुलांनी आपल्याच मित्रावर प्राणघातक हल्ला केला. मारहाणीत जबर जखमी झालेल्या मित्राचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

चाकण औद्योगिक वसाहतीमधील गोसावीनगर इथं ही घटना घडली आहे.  अभिषेक फुलंब्रीकर (वय 17) असं मृत मुलाचे नाव आहे. अभिषेक आणि मुख्यआरोपी गणेश रेड्डी यांच्यासोबत क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा राग डोक्यात ठेवून गणेशने आपल्या 3 अल्पवयीन मित्रांच्या मदतीने अभिषेकवर हल्ला चढवला.

IPL 2021: चेन्नई सुपरकिंग्स प्लेऑफ गाठणार नाही, या प्लेअर्सचा दावा

चौघांनी मिळून अभिषेकला बेदम मारहाण केली. या अल्पवयीन मित्रांनीच प्राणघातक हल्ला करत डोक्यात, डोळयाजवळ, तोंडावर नाकातोडातून रक्त येईपर्यंत मारहाण करून गंभीर जखमी केले होते.

मुस्लीमांसंदर्भातील वक्तव्य करणं भोवलं; ममता बॅनर्जींविरोधात ECची नोटीस

जखमी अवस्थेत अभिषेकला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, उपचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाला.  या प्रकरणी चाकण पोलिसांत हत्येतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या हत्येतील मुख्यसुत्रधार गणेश रेड्डीला अटक तर 3 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सदर हत्येतील अल्पवयीन मुलांना न्यायालयासमोर हजर करून रिमांड होममध्ये दाखल करण्यात आले आहे.

Published by: sachin Salve
First published: April 7, 2021, 11:04 PM IST
Tags:

ताज्या बातम्या