Home /News /pune /

Pune: आधी बलात्कार केला मग कर्कटकाने शरीरावर दिल्या 25 जखमा; नराधम जेलमध्ये सडणार, कोर्टाने सुनावली शिक्षा

Pune: आधी बलात्कार केला मग कर्कटकाने शरीरावर दिल्या 25 जखमा; नराधम जेलमध्ये सडणार, कोर्टाने सुनावली शिक्षा

16 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत क्रूरतेचा कळस गाठत तिच्यावर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या (Minor girl rape and brutal murder) केल्या प्रकरणी पुण्यातील एका तरुणाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली (court sentenced life imprisonment) आहे.

    पुणे, 11 जानेवारी: 16 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत क्रूरतेचा कळस गाठत तिच्यावर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या (Minor girl rape and brutal murder) केल्या प्रकरणी पुण्यातील एका तरुणाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली (court sentenced life imprisonment) आहे. तसेच दहा हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश माधुरी एम. देशपांडे यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. नराधमाने पीडित मुलीच्या चेहऱ्यासह संपूर्ण शरीरावर कर्कटकाने 25 ओरखडे ओढले होते. आकाश नाथा कोळी असं शिक्षा झालेल्या 19 वर्षीय नराधमाचं नाव आहे. तो पुण्यातील पाषाण परिसरातील रहिवासी आहे. तर पीडित अल्पवयीन मुलगी देखील पाषाण परिसरात शिकवणीसाठी येत होती. आकाश याचं पीडित मुलीवर एकतर्फी प्रेम होतं. एकतर्फी प्रेमातून त्याने अनेकदा पीडित मुलीचा पाठलाग केला होता. दरम्यान घटनेच्या दिवशी 8 सप्टेंबर 2012 रोजी पीडित मुलगी शिकवणीवरून रात्री साडे सातच्या सुमारास आपल्या घरी चालत चालली होती. हेही वाचा-मुंबईहून परतताच गर्लफ्रेंडला गुपचूप भेटला;दुसऱ्या दिवशी तलावात तरंगत होता मृतदेह एकटीला चालत जाताना पाहून आधीच दबा धरून बसलेल्या आरोपीनं तिची अडवणूक केली. तसेच तिच्यावर प्रेम असल्याचं सांगितलं. मात्र मुलीने त्याला स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या आकाश कोळी याने पीडितेला जवळच असलेल्या एका मैदानावरील झुडपात नेलं. याठिकाणी नराधमाने क्रूरतेच्या परिसीमा गाठत तिचं नाक आणि तोंड दाबून तिच्यावर अमानुष बलात्कार केला. नराधम एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडित मुलीच्या बॅगमधील कंपास पेटीतील कर्कटकाने तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर अमानुष पद्धतीने ओरखडे ओढले. हेही वाचा-15 वर्षे वनवास भोगला पण शेवटी हरलीच; पतीच्या छळाला कंटाळून उचललं भयावह पाऊल मुलगी बराच वेळ झालं घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पण दुसऱ्या दिवशी पाषाण येथील डीएससी क्वार्टर्स येथील मोकळ्या मैदानावर मुलीचा मृतदेह आढळला. या खटल्याचं कामकाज सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी पाहिलं. त्यांनी एकूण 19 साक्षीदार तपासले. यामध्ये नोडल अधिकारी दत्ता अंगरे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश माधुरी एम. देशपांडे यांनी आरोपी तरुणाला दोषी ठरवत त्याला जन्मठेप आणि दहा हजार रुपयांचा दंड सुनावला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune, Rape on minor

    पुढील बातम्या