मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

बेदरकारपणे कार चालवून दोघांना चिरडले

बेदरकारपणे कार चालवून दोघांना चिरडले

pimpri_cinchwad_Accident20 जानेवारी : रस्त्यावरील वाहनं आणि नागरिकांना बेदरकारपणे चिरडून कार चालकाने पळ काढल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडलीये. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर इतर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

शहरातल्या पिंपळे गुरव भागात रात्री उशिरा हा अपघात घडला. मृतांमध्ये एका 6 महिन्यांच्या चिमुकलीचा समावेश आहे. मुंबईहून पुण्याकड़े येणार्‍या एका वाहन चालकानं त्याच्या गाडी न चालवता येणार्‍या मित्राला गाड़ी चालवायला दिली आणि ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

[if0] Follow @ibnlokmattv[sc0]

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: पिंपरी-चिंचवड