पुण्यात बालविवाह...अल्पवयीन मुलीचे आई-वडिलांनी लावून दिले लग्न

पीडित मुलीच्या मामाने तक्रार दिल्यानंतर आई-वडील आणि नवऱ्या मुलाविरोधात शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 28, 2019 07:02 PM IST

पुण्यात बालविवाह...अल्पवयीन मुलीचे आई-वडिलांनी लावून दिले लग्न

रायचंद शिंदे,(प्रतिनिधी)

शिरुर,28 ऑगस्ट: शिरुर तालुक्यात आई वडिलांनी आपल्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीच्या मामाने तक्रार दिल्यानंतर आई-वडील आणि नवऱ्या मुलाविरोधात शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर पोलिसांनी पुढील तपास उस्मानाबाद पोलिसांकडे वर्ग केला आहे.

मिळालेली माहिती अशी की, शिरुर तालुक्यातील कासारी येथे कामानिमित्ताने राहणाऱ्या एका दाम्पत्याने त्यांच्या 12 वर्षीय मुलीचे लग्न 25 वर्षीय मुलाशी उस्मानाबाद येथील महादेव मंदिरात लावून दिले. अल्पवयीन मुलीच्या मामाने दिलेल्या तक्रारीवरून नवविवाहित मुला-मुलींच्या आई-वडिलांसह अल्पवयीन मुलीच्या पतीवर देखील गुन्हा दाखल केला आहे. कासारी येथे कामानिमित्ताने राहणारे मुळचे सोलापूर जिल्ह्यातील हनुमंत कदम व सविता कदम यांची उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रवीण मते यांच्याशी ओळख झालेली होती. त्यांनतर जुलै महिन्याच्या अखेरीस हनुमंत कदम व सविता कदम या मुलीच्या आई वडिलांनी प्रवीण मते यांचे आई-वडील लहू मते व मंगल मते यांच्याशी चर्चा करून 12 वर्षाय मुलगी असल्याचे माहित असताना देखील तिचे लग्न प्रवीणसोबत ठरविले. त्यांनतर कळंब, (जि.उस्मानाबाद) येथील महादेव मंदिरात प्रियांका व प्रवीण यांचे लग्न त्यांच्या कोणत्याही नातेवाईकांना न सांगता लावून दिले. काही दिवसांपूर्वी नवविवाहित प्रवीण व प्रियांका हे मुलीचे आई वडील राहत असलेल्या कासारी (ता.शिरूर) येथे राहण्यास आले.याकाळामध्ये प्रवीण याने मुलीच्या आई वडिलांना काही पैसे उसने दिलेले होते. प्रवीण याने मुलीच्या आई वडिलांना उसने पैसे दिल्याच्या कारणावरून मारहाण केली होती. मारहाण केल्याचा हा प्रकार या मुलीने मुलीने तिच्या मामांना फोन करून सांगितला.

मामा विनोद भीमराव कोरडे (रा. गौर, ता.कळंब, जि.उस्मानाबाद) यांनी शिक्रापूर पोलिसांना घडलेली सर्व हकीगत सांगितली. त्यांनतर शिक्रापूर पोलिसांनी तातडीने कासारी येथे जात अल्पवयीन मुलीसह तिची आई व पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले, याबाबत मुलीच्या मामाने यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अल्पवयीन मुलीचे वडील हनुमंत जनार्दन कदम व आई सविता हनुमंत कदम दोन्ही (रा.नारी, ता.बार्शी, जि.सोलापूर) सध्या रा.कासारी नवविवाहित मुलगा प्रवीण लहू मते, मुलाचे वडील लहू रामा मते, आई मंगल लहू मते तिघे राहणार दहिफळ (ता. कळंब, जि.उस्मानाबाद) यांच्यावर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा तपास उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा पोलीस स्टेशन येथे रवाना करण्यात आला आहे.

बोटीत जाण्याआधी भरधाव ट्रक कोसळला थेट समुद्रात, VIDEO व्हायरल

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 28, 2019 12:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...