Home /News /pune /

संतापजनक! 11 वर्षीय मुलीवर वडील, भाऊ, आजोबा अन् मामाकडून बलात्कार; पुण्याला हादरवणारी घटना

संतापजनक! 11 वर्षीय मुलीवर वडील, भाऊ, आजोबा अन् मामाकडून बलात्कार; पुण्याला हादरवणारी घटना

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Rape in Pune: पुणे शहरातील ताडीवाला रोड परिसरात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत तिच्या वडिलांनं, अल्पवयीन भावाने, आजोबा आणि चुलत मामाने अमानुषतेचा कळस गाठला आहे.

    पुणे, 19 मार्च: पुणे शहरातील ताडीवाला रोड परिसरात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत तिच्या वडिलांनं, अल्पवयीन भावाने, आजोबा आणि चुलत मामाने अमानुषतेचा कळस गाठला आहे. नराधम आरोपींनी वेळोवेळी धमकी देत पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. कोरेगाव पार्क येथील एका इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये केलेल्या समुपदेशनातून हा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीनं समुपदेशन करणाऱ्या महिलेला तिच्यावर झालेल्या अत्याचाराची आपबिती सांगितली आहे. याप्रकरणी 29 वर्षीय समुपदेशक महिलेनं बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. बंडगार्डन पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमाअंतर्गत पिडित मुलीचे वडील (वय 45), भाऊ (वय 14), आजोबा आणि चुलत मामा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अत्याचाराची ही घटना उघडकीस येताच पोलीसही हादरले आहेत. पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केली नसून घटनेचा सविस्तर तपास केला जात आहे. हेही वाचा-पुण्यात डिलिव्हरी बॉयचं तरुणीसमोर अश्लील कृत्य;पार्सल देताच पॅन्टची चेन उघडली अन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 वर्षीय पीडित मुलगी पुण्यातील कोरोगाव पार्क परिसरातील एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकते. तर फिर्यादी महिला समुपदेशक म्हणून काम करते. घटनेच्या दिवशी फिर्यादी महिला अल्पवयीन मुलींना 'गूड टच आणि बॅड टच' बाबत समजावून सांगण्यासाठी आल्या होत्या. दरम्यान, समुपदेशन करत असताना शाळेतील एका 11 वर्षीय मुलीनं आपल्यावर मागील चार वर्षांपासून अत्याचार होत असल्याची माहिती फिर्यादी महिलेला दिली. हेही वाचा-पैशांसाठी गर्भवती पत्नीच्या जीवाशी खेळ, विवाहितेला उपाशी ठेवत पतीकडून अमानुष छळ फिर्यादी महिलेनं पीडित मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर समुपदेशन करणाऱ्या महिलेनं बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पीडित मुलीच्या मते, 2017 साली ती बिहारमध्ये असताना तिच्या वडीलांनी घरात कोणीही नसताना तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर नोव्हेबर 2020 मध्ये ताडीवाला रोड येथे वास्तव्याला असताना पीडितेच्या 14 वर्षीय भावानं तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले. आरोपीनं पीडितेला धमकी देत अनेकदा अत्याचार केले आहेत. हेही वाचा-मुलगा होत नसल्यानं पत्नीला जिवंत जाळलं; चिमुकल्या लेकीनं आईला मिळवून दिला न्याय एवढंच नव्हे तर, जानेवारी 2021 मध्ये तिच्या आजोबांनी तर मे 2021 मध्ये तिच्या चुलत मामाने तिच्याशी अतिप्रसंग केला आहे. याबाबत बंडगार्डन पोलिसांनी चारही आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता सपकाळे करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Pune, Rape on minor

    पुढील बातम्या