Home /News /pune /

मराठा आरक्षण स्थगितीचा पहिला फटका, मराठ्यांची 35 हजार मुलं राहणार प्रवेशापासून वंचित?

मराठा आरक्षण स्थगितीचा पहिला फटका, मराठ्यांची 35 हजार मुलं राहणार प्रवेशापासून वंचित?

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या निर्णयाचा पहिला फटका हा अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला बसला आहे.

पुणे, 12 ऑक्टोबर : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने  स्थगिती दिली आहे. या निर्णयाचा पहिला फटका हा अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे फक्त प्रवेश प्रक्रिया थांबलेली नाहीतर तब्बल 35 हजार 922 मराठा विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहावं लागणार आहे. कोरोनाच्या महामारीमुळे आधीच रेंगाळलेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑगस्टपासून ऑनलाइन पद्धतीने अगदी सुरळीतपणे सुरू होती. पहिला राऊंड संपून दुसरी यादीही 10 सप्टेंबरला प्रसिद्ध होणार होती. पण 9 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आणि आपसूकच प्रवेश प्रक्रिया देखील रखडली. तुरीच्या पिकासोबत शेतकऱ्याने केली कमाल, पोलीसही झाले हैराण मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने तब्बल 35 हजार मराठा विद्यार्थ्यांना आरक्षण हक्कापासून वंचित राहावं लागणार आहे. म्हणूनच सरकारने या प्रश्नी तात्काळ एखादा मध्यममार्गी तोडगा काढून अकरावीची प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थी संघटना करत आहेत. राज्यात अकरावीच्या एकूण 5 लाख 59 हजार 130 जागा आहेत. त्यापैकी पहिल्या राऊंडमध्ये 1 लाख 46 हजार 130 प्रवेश पूर्ण देखील झाले आहे. या पहिल्या यादीत SEBCच्या 12 टक्के आरक्षणानुसार मराठा समाजाच्या 4 हजार 199 मुलांना अकरावीत प्रवेशही मिळाला आहे. पण सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे एसईबीसी आरक्षण कोट्यातील उर्वरित 35 हजार जागा यापुढे भरता येणार नाही. त्यामुळे राज्य सरकार या मराठा आरक्षण स्थगितीवर नेमका काय तोडगा काढतंय हे पाहावं लागणार आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या