पिंपरी, 28 मे: मागील काही दिवसांपासून देशात कोरोना विषाणूचा संसर्ग (Corona Pandemic) झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळे देशात दररोज हजारो कोरोनाबाधित रुग्ण (Corona cases) नव्यानं आढळत आहे. याचा प्रचंड ताण आरोग्य व्यवस्थेवर पडत आहे. अशा स्थितीत रुग्णांना लुटण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. कोरोना काळात रुग्णांची लूट करण्यासाठी बोगस डॉक्टरांच्या (Fake doctors) अनेक घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. यानंतर आता पिंपरीतील एका बोगस डॉक्टराचा भांडाफोड करण्यात (10th pass fake doctor exposed in pimpari) आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत संबंधित बोगस डॉक्टरला बेड्या ठोकल्या आहेत.
अक्षय केशव नेहरकर असं संबंधित अटक झालेल्या बोगस डॉक्टरचं नाव असून तो चिंचवड परीसरातील बिजलीनगर येथील रहिवासी आहे. आरोपी नेहरकर याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसून तो केवळ दहावी पास आहे. असं असताना त्यानं पिंपरीतील एका रुग्णालयात डॉक्टर म्हणून चक्क एक वर्षभर काम केलं आहे. मात्र त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही. इन्शुरन्स कंपनीचे विशाल भास्कर काटकर यांनी पिंपरी पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी नेहरकरचा भांडाफोड झाला आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पिंपरी पोलिसांनी तातडीनं पावलं उचलत आरोपी अक्षय नेहरकरला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सांगितलं आरोपी नेहरकर केवळ दहावी पास असून गेल्या एका वर्षांपासून तो पिंपरीतील एका रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत होता. दरम्यानच्या काळात त्यानं अनेक गंभीर रुग्णांवर उपचार करत त्यांच्या जीवाशी खेळ सुरू केला होता. पण इन्शुरन्स कंपनीचे विशाल भास्कर काटकर यांना संशय आल्यानं त्यांनी पिंपरी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
हे ही वाचा-अभ्यास न केल्यानं वडिलांनी बेदम मारहाण करत मोडला मुलीचा हात; लैंगिक छळाचाही संशय
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी नेहरकरला अटक केली असून त्याला संबंधित रुग्णालयात नियुक्ती करण्यात कोणाचा हात आहे ? याचा तपासही पोलिसांकडून केला जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Fake, Pune