• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • 10 वर्षांच्या आर्यनचा पाय घसरला अन् शेततळ्यात बुडाला, दुसऱ्या दिवशी मित्रांनी सांगितला प्रसंग

10 वर्षांच्या आर्यनचा पाय घसरला अन् शेततळ्यात बुडाला, दुसऱ्या दिवशी मित्रांनी सांगितला प्रसंग


त्यावेळी दोघेही मित्र घाबरून तेथून पळून आपापल्या घरी गेले होते. त्यामुळे रात्रभर आर्यनचा शोध सुरू होता.

त्यावेळी दोघेही मित्र घाबरून तेथून पळून आपापल्या घरी गेले होते. त्यामुळे रात्रभर आर्यनचा शोध सुरू होता.

त्यावेळी दोघेही मित्र घाबरून तेथून पळून आपापल्या घरी गेले होते. त्यामुळे रात्रभर आर्यनचा शोध सुरू होता.

 • Share this:
  पुणे, 21 सप्टेंबर : मित्रांसोबत खेळत असताना हात पाय धुण्यासाठी शेततळ्यावर गेला. पण, 10 वर्षांच्या आर्यनचा पाय घसरला आणि शेततळ्यातून बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना  पुणे (pune) जिल्ह्यातील इंदापूर (indapur) शहरातील सरस्वतीनगर इथं घडली आहे. 10 वर्षांच्या आर्यनच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन मच्छिंद्र नाथजोगी (Aryan Machhindra Nathjogi) असं या मृत मुलाचे नाव आहे. आर्यन हा चौथ्या वर्गात शिकत होता.  सोमवारी सायंकाळी आर्यन हा आपल्या दोन मित्रांसोबत  क्रीडासंकुलाच्या मैदानावर खेळत होता. खेळून झाल्यावर  हात पाय धुण्यासाठी पाठीमागे असलेल्या शेततळ्यावर  आर्यन आणि त्याचे मित्र गेले. शेततळ्याच्या किनाऱ्यावर  हात पाय धुतू असताना अचानक आर्यनचा पाय घसरला आणि तो तलावात पडला होता. आर्यन अचानक पाण्यात पडल्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्याने वाचवण्यासाठी आरडाओरडा केला. आईने बाळाला टॉवेलऐवजी बँडेजमध्येच गुंडाळून ठेवलं; कारण वाचून डोळ्यात येईल पाणी त्यावेळी दोघेही मित्र घाबरून तेथून पळून आपापल्या घरी गेले होते. त्यामुळे रात्रभर आर्यनचा शोध सुरू होता.आर्यनच्या कुटुंबीयांनी जेव्हा त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असता आर्यनच्या मित्रांनी आज सकाळी या घटनेची हकीकत सांगितली. त्यानंतर सर्वांनी शेततळ्याकडे धाव घेतली.  शेततळ्यात आर्यनचा शोध घेण्यात आला. यावेळी त्याचे मृत शरीर तलावात आढळून आले. IPL 2021 : फिटनेससाठी रोज 30 मिनीटं धावत स्टेशनवर जायचा, आता आयपीएलमध्ये पदार्पण 10 वर्षांच्या आर्यनचा दुर्दैवी मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. तलावाला लागून असलेल्या क्रीडासंकुलाच्या कंपाऊंडच्या भिंतींची उंची आणि पश्चिमेकडे तलावाला असलेली तारेची संरक्षक जाळी बदलण्याची मागणी सदर परिसरातील नागरिकांनी केली आहे.
  Published by:sachin Salve
  First published: