मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

बेरोजगारी कंटाळून 1 वर्षाच्या मुलाचा आणि पत्नी चिरला गळा, नंतर घेतला गळफास, पुणे हादरलं

बेरोजगारी कंटाळून 1 वर्षाच्या मुलाचा आणि पत्नी चिरला गळा, नंतर घेतला गळफास, पुणे हादरलं

गेल्या काही दिवसांपासून ते कामाच्या शोधात होते. पण हाती काही काम लागले नाही.

गेल्या काही दिवसांपासून ते कामाच्या शोधात होते. पण हाती काही काम लागले नाही.

गेल्या काही दिवसांपासून ते कामाच्या शोधात होते. पण हाती काही काम लागले नाही.

पुणे, 10 मे: कोरोनाच्या (Corona) महामारीत लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आले आहे. या परिस्थितीत अनेकांचे रोजगार बुडाले आहे, तर काही जणांचे हातचे काम गेले आहे. पुण्यातील (Pune) लोणी काळभोरमध्ये बेरोजगारीला कंटाळून एका तरुणाने 1 वर्षाच्या मुलाची आणि पत्नीचा हत्या करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कदमवाक वस्ती परिसरात रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.  हनुमंत शिंदे (वय 38) असं आत्महत्या केलेल्या पतीचं नाव आहे. हनुमंत शिंदे याने पत्नी प्रज्ञा शिंदे (वय 28) आणि एक वर्षांचा मुलगा शिवतेज यांची गळा चिरुन हत्या केली.

बापरे! अभिनेत्रीनं मुलासाठी आणला डायनासॉर; पाहून तुम्हालाही बसेल धक्का

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत शिंदे हे सोलापूर जिल्हातील रहिवासी होते. कामाच्या शोधात हनुमंत शिंदे हे लोणी काळभोर भागातील कदमवाक परिसरात राहण्यासाठी आले होते.  हनुमंत शिंदे हा पत्नी आणि मुलासोबत अनेक वर्षांपासून राहत होते. मात्र गाडीवर चालक होते. पण काम नसल्याने अनेक दिवसांपासून तणावात असायचे. काम न मिळालेल्या चिंतेतून रविवारी त्यांनी पत्नी प्रज्ञाची सुरीनं गळा कापून हत्या केली. त्यानंतर एक वर्षाच्या मुलाचीही गळा कापून हत्या केली. त्यानंतर स्वत: पंख्याला गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली.

कोरोनानं मुलगा हिरावला, विरह सहन न झाल्यानं मातृदिनीच आईनंही सोडले प्राण

हनुमंत हे प्रचंड मानसिक तणावात असल्याचं त्याच्या पत्नी नातेवाइकांना सांगितलं होतं. मात्र, नातेवाईकांनी फार गांभीर्याने न घेतल्याने हनुमंत यांना वेळेस मानसिक आधार आणि धीर न दिल्यामुळे त्याने नैराश्यातून पोटच्या मुलाचा गळा चिरून पत्नीचा गळा दाबून खून केला आणि स्वतःही आत्महत्या केली हा सगळा प्रकार संवेदनशील समाज मनाला हादरवून टाकणारा आहे.या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस स्टेशमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाच्या महामारीत बेरोजगारी वाढल्याने अशा घटनांमध्ये दुर्दैवाने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

First published:

Tags: Suicide