अद्वैत मेहता,पुणे
17 सप्टेंबर : पुण्यातलं गरवारे बालभवन चालवणार्या ओम चॅरिटेबल ट्रस्टच्या अडचणी वाढल्यात. महापालिकेनं बालभवनच्या इमारतीचं वार्षिक भाडं 17 हजार रुपयांवरून थेट 7 लाख 20 हजार रुपये एवढं केलंय. एकीकडे राजकारण्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनींचं भाडं माफ करायचं. त्या जमिनी एक रुपयाच्या दरानं भाड्यावर द्यायच्या आणि लहान मुलांच्या खेळण्या-बागडण्याच्या जागांवर अशी टाच आणायची, असा पुणे महापालिकेचा कारभार राहिलाय.
पुण्यात सारस बागेसमोरचं गरवारे बालभवन म्हणजे लहान मुलांचं हक्काचं ठिकाण..यामुळेच पुण्यासह महाराष्ट्रात तब्बल 250 बालभवनं उभी राहिली. पण या बालभवनच्या जागेवर सतत राजकारण्यांचा डोळा असतो. यामुळे त्याच्यावर सतत टांगती तलवार लटकत असते. बालभवनातल्या मोकळ्या मैदानाचं भाडं पालिकेनं नाममात्र 1 रुपया ठेवलंय हे लहान मुलांवर केलेले उपकारच म्हणायचे. लहान मुलांच्या विकासाकडे पाहताना, पैशांचा विचार करून चालणार नाही, असं बालभवन चालकांचं म्हणणं आहे
बालभवनच्या पाठीमागे भक्कमपणे आर्थिक पाठबळ उभं करण्याऐवजी पुणे महापालिकेचा धंदेवाईक दृष्टीकोन या चांगल्या प्रकल्पाचा घास तर घेणार नाही ना अशी भीती आता पुणेकरांच्या मनात निर्माण झालीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.