• VIDEO : धनंजय मुंडेंची सडेतोड UNCUT मुलाखत

    News18 Lokmat | Published On: Feb 6, 2019 08:29 PM IST | Updated On: Feb 6, 2019 08:46 PM IST

    06 फेब्रुवारी : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी न्यूज18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चा कार्यक्रमात सडेतोड मुलाखत दिली. यावेळी त्यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाचं तुम्ही राजकारण करतात, या आरोपावर मोठा खुलासा केला आहे. 'गोपीनाथ मुंडे हे माझे काका होते. आमच्यात रक्ताचे नाते होते. मुंडे साहेबाचं जेव्हा अपघात झाला त्यानंतर सीबीआयने चौकशी करून आपला अहवाल दिला. त्यात हा अपघात असल्याचं समोर आलं. त्यामुळे तो मान्य करणे साहजिकच आहे. पण गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचं त्या अहवालाबद्दल समाधान झाले नाही. चार वर्षात एका केंद्रीय मंत्र्यांचं निधन होतं, गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरची चूक आहे की, धडक देणाऱ्या ड्रायव्हरची चूक आहे. यात कुणाला तरी शिक्षा झाली पाहिजे होती ना? चार वर्षांत न्यायालयात काही झाले नाही. त्यांच्या पीएची ड्रायव्हरची चौकशी का झाली नाही?' असा सवाल उपस्थितीत करत गोपीनाथ मुंडे यांचा अपघात नाही हा घातपात असल्याचा संशय मुंडेंनी व्यक्त केला. तसंच 'पंकजा मुंडे यांना चिक्की घोटाळ्यात क्लीन चिट मिळालेली नाही. ज्या सचिवांना चौकशीचे आदेश दिले होते त्यांचा अहवालाच आजपर्यंतच आलाच नाही' असा खुलासा धनंजय मुंडे यांनी केला आहे तसंच 'मी 16 मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढले. त्यामुळे त्यांनी माझ्यावर वाटेल ते आरोप केले. परंतु, आतापर्यंत एकाही मंत्र्यांने माझ्यावर मानहानीचा दावा केला नाही. तोडपाणीचा आरोप करायचा असेल तर ते सिद्ध करून दाखवा, तुमच्याकडे सत्ता आहे, तुम्ही खुशाल चौकशी करा, मी त्यासाठी तयार आहे' असं थेट आव्हानच धनंजय मुंडे यांनी सरकार दिलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading