News18 लोकमतचा खास उपक्रम #सन्मानबळीराजाचा 2017

शेतकऱ्यांच्या कष्टाला आणि जिद्दीनं लढत पुढ जाणाऱ्या वृत्तीला न्यूज18 लोकमतचा हा मानाचा मुजरा म्हणजेच सन्मान बळीराजाचा...

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 14, 2017 12:12 AM IST

News18 लोकमतचा खास उपक्रम #सन्मानबळीराजाचा 2017

शेतकरी आणि शेतीच्या प्रश्नावर सध्या देशभर जोरदार चर्चा सुरू आहे..शेतकरी आत्महत्येच्या भीषण प्रश्नानं समाजमन अस्वस्थ झालंय. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. निसर्गाची साथ नाही. अशा प्रतिकूल परिस्थितही काळ्या मातीतून आपल्या अपार कष्टानं सोनं उगवून सगळ्यांची भूक भागवणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्याचा सन्मान आज न्यूज18 लोकमत करणार आहे.

#सन्मानबळीराजाचा2017 - परिसंवाद : शेतकऱ्यांना शेतीमालाचा योग्य भाव का मिळत नाही ? नागपूरहुन थेट

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून नवे प्रयोग करत यशस्वी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी न्यूज18 लोकमतनं पुढाकार घेत नागपूरमध्ये सन्मान बळीराजाचा या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. शेतकऱ्यांच्या सत्कारासोबतच विविध चर्चा सत्रांचं आयोजनही करण्यात आलंय. यात प्रगतिशिल शेतकरी, ज्येष्ठ शेततज्ञ, अधिकारी आणि ज्येष्ठ मंत्री सहभागी होत आहेत. शेतकऱ्यांच्या कष्टाला आणि जिद्दीनं लढत पुढ जाणाऱ्या वृत्तीला न्यूज18 लोकमतचा हा मानाचा मुजरा म्हणजेच सन्मान बळीराजाचा...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2017 06:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...