• होम
  • व्हिडिओ
  • संगीतकार ए. आर. रेहमानानं भारतीय संगीताला अनोख्या उंचीवर नेऊन ठेवलंय का ? (भाग : 2)
  • संगीतकार ए. आर. रेहमानानं भारतीय संगीताला अनोख्या उंचीवर नेऊन ठेवलंय का ? (भाग : 2)

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Jan 14, 2009 01:35 PM IST | Updated On: Jan 14, 2009 01:35 PM IST

    ' हॉलिवूड फॉरिन प्रेस असोसिएशन ' चा ' गोल्डन ग्लोब ' हा पुरस्कार भारतात आणण्याचा विक्रम घडला तो ए. आर. रेहमानमुळंं. रहमानला ' स्लम डॉग मिलिनियर ' या सिनेमासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे. गोल्डन ग्लोबसाठी काही भारतीय संगीतकारांचं नामांकन झालं होतं. पण पुरस्कार मिळाला तो ' मोझार्ट ऑफ मद्रास ' म्हणून ओळखल्या जाणारा भारतीय संगीतकार ए. आर. रेहमान याला. त्यामुळेच आजचा सवाल रेहम्ाानच्या कौशल्यावर , कलेवर, वेगळेपणावर आणि रेहमानच्या अनोखेपणावर आधारित होता. संगीतकार ए. आर. रेहमानानं भारतीय संगीताला अनोख्या उंचीवर नेऊन ठेवलंय का ? या ' आजचा सवाल ' मध्ये चर्चा करण्यासाठी कौशल इनाम, पंचम - निषाद या संस्थेचे कार्यकारी संचालक सतीश व्यास, गायक सुरेश वाडकर, भारतीय गान कोकिळा लता मंगेशकर या नामवंत पाहुण्यांचा समावेश होता. " रेहमानची काम करण्याची तसंच संगीत रेकॉर्डिंग करण्याची पद्धत फार वेगळी आहे. पहिल्या रिहर्सलपासून ते रेकॉर्डिंग करतात. गायक गात असतानाही ते संगीताचे निरनिराळे प्रयोग करतात. असे प्रयोग करण्याची हातोटी रेहमान यांच्या जवळ आहे, " अशी प्रतिक्रिया गान कोकिळा लता मंगेशकर यांनी व्यक्त केली. रहमान आत्मपरीक्षणाला वेळ देतो. तो स्वत:ला त्याच्या प्रत्येक सिनेमासरशी रिइन्व्हेन्ट करत असतो. हेच त्याचं वेगळेपण आहे. कम्पोझर आणि टेक्निशियन म्हणून रेहमानला वेगळंच काढायचं झालं तर कम्पोझर म्हणून त्याच्या इतके आणि त्याच्यापेक्षा खूप चांगले कम्पोझर आपल्याला मिळतील. पण आताचं युग असं आहे की तुम्हाला संगीताबद्दल उत्तम ज्ञान असून चालत नाही. तर त्या संगीताचा वापर करता आला पाहिजे. चांगल्या संगीतकाराला समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणाचंही उत्तम भान असायला पाहिजे जे रेहमान जवळ आहे. त्यामुळे त्याचं संगीत उत्तम होतं. ते इतरांवर अपील होतं, " असं रेहमानच्या संगीताविषयीचं मत कौशल इनामदारनं व्यक्त केलं. " रहमाननं भारतीय आणि पाश्चिमात्त्य संगीत असं एकत्रिकरण केलं नाही. तर त्यातून संगीताचं उत्तम रसायन निर्माण केलं आहे. रहमान हा संगीताच्या बाबतीत जिज्ञासू , अभ्यासू आणि वेळ देणारा संगीतकार आहे. एकावेळेला तो भारंभार सिनेमा हातात घेत नाही. एका वेळेला एकच गोष्ट तो एकाच सिनेमावर काम करतो. त्यामुळे रेहमानचं संगीत, त्याचं काम कानाला भावतं, " असं मत शशी व्यास यांनी कार्यक्रमात व्यक्त केलं. " रेहमान संगीतात जो साऊण्ड इफेक्टचा वापर करतो अफलातून आहे. त्यामुळे त्याची गाणी, संगीत लोकांना आवडतं, " असं सुरेश वाडकर म्हणाले. रहेमाननं चित्रपट संगीताचे काही ठोकताळे मांडले आहेत. त्यात त्यांनं ग्लोबल म्युझिकचा चांगला उपयोग केला आहे.त्यामुळे ज्या दिशेनं रेहमान जात आहे. त्याच दिशेनं भारतीय संगीतानं जायला हवं, यां नोटवर आजचा सवाल 'ची सांगता झाली. संगीतकार ए. आर. रेहमानानं भारतीय संगीताला अनोख्या उंचीवर नेऊन ठेवलंय का ? या प्रश्नावर 91 टक्के लोकांनी ' होय ' असा कौल दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी