S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • मुंबई हल्ल्याबाबत पाकिस्तानची भूमिका खोटारडेपणाची आहे का ? (भाग : 2)
  • मुंबई हल्ल्याबाबत पाकिस्तानची भूमिका खोटारडेपणाची आहे का ? (भाग : 2)

    Published On: Jan 8, 2009 04:46 AM IST | Updated On: Jan 8, 2009 04:46 AM IST

    मुंबई हल्ल्याप्रकरणी भारतानं पाकिस्तानला जेजे म्हणून काही पुरावे दिलेत, तेते पुरावे पाहून पाकिस्तान हडबडला. त्यामुळे अखेर ' अजमल कसाब हा आमच्याच देशाचा नागरिक असल्याचं पाकिस्तानला मान्य करावं लागलं आहे. पाकिस्तानच्या या कबुली जबाबाची बातमी पाकिस्तानच्या डॉन न्यूज चॅनेलनं दिली होती. पाकिस्तानच्या या वृत्ताला पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयानं दुजोरा दिला आहे. पाकिस्तानच्या माहिती मंत्री शेरी रहेमान यांनी ही कसाब पाकिस्तानी असल्याची पुष्टी केली आहे. त्यामुळे ' आजचा सवाल ' ' मुंबई हल्ल्याबाबत पाकिस्तानची भूमिका खोटारडेपणाची आहे का ? ' हा होता. त्यात पाकिस्तानच्या भूमिकेवर चर्चा करण्यात आली. पाकिस्तानशी वागताना भारतानं कसं वागायला हवं हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. गेल्या महिन्याभरामध्ये भारतानं जी मुत्सद्देगिरी दाखवली आहे, जी परराष्ट्रनिती अवलंबलेली आहे ती योग्य आहे का, यामध्ये पाकिस्तानी लष्कराची भूमिका काय आहे, आयएसआयची भूमिका काय आहे आणि पाकिस्तानला धडा शिकवायचा म्हणजे नेमकं काय करायचं, हे प्रश्न 'आजचा सवाल ' मधून उपस्थित झालेत. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी माजी केंद्रीय गृहसचिव माधवराव गोडबोले, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विचारवंत शेषाद्री चारी, राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर या मान्यवर पाहुण्यांचा समावेश होता. पाकिस्ताननं कसाबद्दलची कबुली देऊन मघार खरंच माघार घेतल्याची शंका अनेकांच्या मनात आहे. यावर माधवराव गोडबोलेंचं मत नाही असंच आहे. " पाकिस्ताननं माघार घेतली आहे, असं काही वाटत नाही. कसाब पाकिस्तानी नागरिक नाही, हे म्हणणं पाकिस्तानला कठीण गेलं तसं पाकनं कसाब पाकिस्तानी असल्ययाची कबुली दिली. पण यावरून भारतानं कोणताही अर्थ काढणं योग्य नाही. याही आधी दहशत वादी कारवायांच्या वेळेला पाकिस्तानला आपण पुरावे सादर केले होते आणि त्यातून काहीही निष्पन्न झालेलं नाही. भारताचं पाकिस्तानवर दबाव टाकणं हे एका ठराविक अंतरा पर्यंत योग्य आहे. याचा अर्थ भारताच्या दबावामुळे पाकिस्तान राजी झाला आहे, असा होत नाही. तर यात अमेरिकन सरकारचा हात आहे. अमेरिकन सरकारवर आपण मर्यादे बाहेर अवलंबून आहोत. सतत अमेरिकन सरकारच्या इशा-यावर आपले निर्णय होत आहेत. तसंच सीआयए आणि आयएसआयचे असणारे लागेबांधे आपण विसरून चालणार नाही. मला तरी यात धोका जाणवत आहे, " असं मत माधवराव गोडबोलेंचं आहे. पाकिस्तानशी मुत्सद्देगिरी करण्यासाठी गोडबोलेंनी निरनिराळे उपाय सुचवले. त्यातला भारत -पाक पाणी करार हा महत्त्वाचा होता. ' भारत -पाक पाणी करार झाला आहे. पाकनं जर का आगाऊपणा करायला सुरुवात केली तर पाकला पाणी प्रश्नावरून कोेंडीत पकडावं, असं गोडबोलेंनी सुचवलं. चर्चेत शेषाद्री चारी यांनी चर्चेत माधवरावांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. ते म्हणाले, " भारताची परराष्ट्र नीती दबावाची परराष्ट्र नीती योग्य आहे. पण माधवराव गोडबोलंचं विश्लेषण बहुतांशी खरं आहे. गोडेबाले म्हणातात त्याप्रमाणं कसाब पाकिस्तानचा असणं हे पाकनं मान्य करणं यात भारताची काही खुबी नसून त्यात अमेरिकेचा पाकिस्तानवर असणारा दबाव आहे. हा दबाव आणताना अमेरिकेनं ' भारतानं युद्ध करू नये, ' असं म्हटलं आहे. उद्या जर पाक सरकार असं म्हणालं की कसाब हा आमचा नागरिक आहे, त्याला आमच्याकडे परत द्या. आम्ही आमच्या न्याय व्यवस्थेप्रामणं शिक्षा करू.' अशावेळी भारताला कसाबला पाकिस्तानला परत द्यावंच लागणार आहे. कारण त्यावेळी भारतावर अमेरिकेचा दबाव असेल.अमेरिकेला भारतावर दबाव आणावाच लागणारेय. कारण पाक लष्कर अमेरिकेसाठी अमेरिकन सैन्याच्याबरोबरीनं अफगाणिस्तानशी लढत आहे. भारताला जर पाकिस्तानवर दबावच आणायचा असेल तर पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर भारतानं हल्ला करायला हवा होता. 'आपले निर्णय आपण घेतले पाहिजेत. दुस-यावर अवलंबून राहू नये, " असा सल्लाही शेषाद्री चारी यांनी दिला. " पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ला करणं हे भारताच्या राजकीय दृष्टीनं योग्य नाही, असं मत डॉ. अशोक चौसाळकर यांचं आहे. " पाकिस्तानला दोष देऊन भागणार नाही. आपण आपलं स्वत:चं घरही नीट ठेवलं पाहिजे, ' असंही डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले. याच नोटवर ' आजचा सवाल ' थांबवण्यात आला. चर्चेचा शेवट करताना आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे म्हणाले, " युद्धाची भाषा होत आहे. दहशतवादी तळांवर हल्ले करण्याचीही भाषा होत आहे. पण त्याही पुढे जाऊन पाकिस्तानला रोखण्यासाठी आणि दहशतावादाला आळा घालण्यासाठी अशा एका मुत्सद्देगिरीची गरज आहे. जी भारताकडे आहे की नाही याचीच शंका अनेकांना वाटत आहे. भारतीय परराष्ट्र नीतीच्या कसोटीची वेळ आली आहे. या म्हणूनच या प्रश्नाला भावनात्मक मुद्दा न बनवता त्याकडे अधिक प्रगल्भतेनं बघायला हवं. " ' माधवराव गोडबोलेंनी जे इतर उपाया सुचवलेल्या इतर उपयांचा विचार करायला हवा, ' असंही निखिल वागळेंनी सुचवलंय. मुंबई हल्ल्याबाबत पाकिस्तानची भूमिका खोटारडेपणाची आहे का ? या ' आजचा सवाल ' वर 90 टक्के लोकांनी होय ' असा कौल दिला आहे. ' एकंदरीत पाकिस्तानच्या खोटारडेपणावर कुणाचीही शंका नाहीये. फक्त वाद आहे तो पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा हा आहे, ' असंही निखिल वागळे चर्चेचा शेवट करताना म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close