S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • मराठी आरक्षणाचा मुद्दा आगामी निवडणुकांत कळीचा ठरेल का ? (भाग : 2)
  • मराठी आरक्षणाचा मुद्दा आगामी निवडणुकांत कळीचा ठरेल का ? (भाग : 2)

    Published On: Jan 6, 2009 03:50 AM IST | Updated On: Jan 6, 2009 03:50 AM IST

    पंढरपूरमधल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत महेश चव्हाण आणि कृष्णा पवार या संभाजी बिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. या आत्मदहनाच्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. त्यात मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं नाही तर त्याचे सत्ताधा-यांना भोगावे लागतील, असं या कार्यकर्ते ठणकावून सांगताहेत. आरक्षणाच्या मुद्यावरून महाराष्ट्रात गोंधळाची परिस्थिती निर्माण झालीये. त्यात संभाजी बिग्रेडचे कार्यकर्ते हे अधिकाधिक आक्रमक बनत आहेत. आगामी लोकसभेच्या आणि त्यानंतर येणा-या विधान सभेच्या निवडणुका पाहता संभाजी बिग्रेडचे कार्यकर्ते सत्ताधा-यांवर दबाव टाकत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना शेवटी जाहीर करावं लागलं की, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आम्ही विचार करू. त्यांनी काहीच स्पष्ट आश्वासन दिलेलं नाहीये. परंतु विचार करू असं म्हटलं आहे. हे पाहता मराठी आरक्षणाचा मुद्दा आगामी निवडणुकांत कळीचा ठरेल का ? हा प्रश्न आजचा सवालमध्ये विचारण्यात आला. या चर्चेत संभाजी बिग्रेडचे प्रदेश कार्याध्यक्ष संभाजी बिग्रेड , ओबीसी सेवा संघाचे महासचिव श्रावण देवरे, अखिल भारतीय मुस्लिम ओबीसी संघांचे संस्थापक शब्बीर अन्सारी, काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांचा चर्चेत समावेश होता. चर्चेची सुरुवात प्रवीण गायकवाड यांच्यापासून झाली. " निवडणुकी आधी जर आरक्षण मान्य झालं नाही यापुढे आम्ही मराठी नेत्यावरच आक्रमण करू, " इतकी कमालीची कडवट भाषा संभाजी बिग्रेडचे कार्यकर्ते वापरत आहेत. त्याविषयी प्रवीण गायकवाड सांगतात, " आमचे कार्यकर्ते स्वत:ला जाळून घेणार आणि नेत्यांना मिठी मारणार. प्रत्येक जिल्ह्यामध्ये संभाजी बिग्रेडचे 25 - 25 कार्यकर्त्यांचं आत्मघातकी पथक तयार आहे. शेतक-यांच्या आत्महत्त्या झाल्या. सरकार त्यांना काही मदत देत नाहीये. वीज माफी केली होती. पण सत्तेवर आल्यावर काढून घेतली. शेतक-यांची फसवणूक झाली आहे. आम्हाला निवडणुकीनंतर सकारकडून काहीही नकोय. तर निवडणुकी आधीच हवं आहे. त्यासाठी आम्ही सत्ताधारी सरकारच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडलं आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आगामी निवडणुकात पराभव करण्याचं आव्हान आम्ही करणार आहोत. हे करत असताना शिवसेना - भाजपला निवडून द्या असं आम्ही सांगणार नाही. तर आम्ही स्वत: निवडणुका लढवू अशी परिस्थिती निर्माण करू. " प्रवीण गायकवाड यांच्या टोकाच्या भूमिकेला उत्तर देताना भाई जगताप म्हणाले, " मराठी समाजाला आरक्षण द्यायचं की नाही हे मी काही एकटाच ठरवणार नाही. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आश्वासन दिलं आहे. ते काही एका दिवासात होणार नाही. तर त्याला थोडा वेळ लागणार. " अशा अतेरिकी पद्धतीनं आरक्षणाची मागणी करणं योग्य नाही आहे. ते फुले-शाहू-आंबेडकारांच्या महाराष्ट्राला शोभणार नाहीये. आजपर्यंत जेवढे म्हणून जातींच्या समस्येवर आयोग झाले आहेत, त्यांनी मराठा समाजाला आरक्षणाची काहीच गरज नाहीये, असं सांगितलेलं आहे. त्यामुळे दबाव आणून आरक्षण पदरात पाडणं अशोभनीय आहे, " असं मत श्रावण देवरे यांनी चर्चेत व्यक्त केलं आहे. " आरक्षणाचा मुद्दा विचारात घेताना सामाजिक दृष्ट्या समाजाचं मागसलेपण लक्षात घेतलं जातं. मराठा समाज हा दलित, आदिवासींसारखा मागासलेला नाहीये. त्या मराठा समाजाला आरक्षण लागूच पडत नाही, ' असं शब्बीर अन्सारी यांचं चर्चेत म्हणणं होत. ' शिवाजी महाराजांना क्षुद्र मानण्यात आलं होतं. लोकमान्य टिळकांना शाहू महाराजांनाही क्षुद्र लेखलं होतं, ' असे वादग्रस्त मुद्दे चर्चेत प्रवीण गायकवाड यांनी मांडले. चर्चेत संभाजी बिग्रेडनं आक्रमक पावित्रा घेतला. त्यावरूनआगामी निवडणुकांत हा मुद्दा 100 टक्के वादग्रस्त ठरणार आहे, असा अंदाज आला. आरक्षण मागण्यासाठी आततायीपणा करू नका, असं आमदार भाई जगताप यांनी संभाजी बिग्रेडला सुचवलं. त्याच नोटवर चर्चेचाशेवट करण्यात आला. मराठी आरक्षणाचा मुद्दा आगामी निवडणुकांत कळीचा ठरेल का ? या ' आजच्या सवाल ' वर 93 टक्के लोकांनी ' हो ' असा कौल दिला. चर्चेचा शेवट करताना आयबीएन-लोकमत 'चे संपादक निखिल वागळे म्हणाले, "आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत मरराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. आत्मदहन करून किंवा कुणाच्या जीवाला धोका पोहोचवून हा मुद्दा सुटणारा नाही. हा लोकशाही मार्गानंच सुटू शकतो. त्यावर उपाय निर्माण होऊ शकतो. आरक्षणाचा मुद्दा संवेदनशील आहे. मंडल आयोगाच्या वेळेला जसा भडका उडाला होता तसा भडका उडू नये, तसंच महाराष्ट्रात शांतता नांदावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close