• गप्पा संगीता चितळेंशी (भाग : 2)

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Jan 2, 2009 08:01 AM IST | Updated On: Jan 2, 2009 08:01 AM IST

    संपूर्ण महाराष्ट्रात महागायिका म्हणून प्रसिद्ध असणार्‍या संगीता चितळे ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये आल्या होत्या. ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये त्यांनी एकापेक्षा एक सरस गाणी गायलीत. महाराष्ट्राची महागायिका बनण्यावपूर्वी त्या छोट्या मोठ्या कार्यक्रमांतून गायच्या. स्वत:च्या आणि इतरांच्या आनंदासाठी गाणं गायचं एवढंच त्यांना ठाऊक होतं. मुलं मोठी झाल्यावर गाणं सोडायचंही त्यांनी ठरवलं होतं. पण सासुबाई आणि मिस्टर अरविंद चितळे यांच्यामुळे त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी गाण्याची आवड पुढे तशीच सुरू ठेवली. सारेगमपमध्येही त्या सासुबाई आणि मिस्टरांच्या आग्रहाखातर गेल्या. संध्याकाळपर्यंत त्यांचा काही नंबर लागला नव्हता. त्या कंटाळल्या होत्या. घरी परत यायला निघाल्या होत्या. पण मिस्टरांनी सांगितलं की प्रयत्न कर. चिकाटी सोडू नको. अखेर त्यांचा नंबर लागला. त्यांचं गाणं परीक्षकांना इतकं आवडलं की त्या सिलेक्ट झाल्या. तेव्हापासून त्यांच्या महागायिकेच्या प्रवासाला सुरुवात झाली. गाण्याचा भाव जाणून, शब्दांचा अर्थ नीट व्यवस्थित समजून गाणं गायलं तर ते जास्त समजतं, असं त्यांचं म्हणणं आहे. वासंती साठे, डॉ. ललित नरुलकर आणि आरती अंकलीकर हे संगीता चितळेंचे गुरू आहेत. ' मोगरा फुलला... मोगरा फुलला...' , ' रजनीगंधा जीवनी या बहरूनी आली...' सारखी गाणी गाऊन त्यांनी अनेकांच्या रसना तृप्त केल्यात. संगीता चितळेंच्या ' सलाम महाराष्ट्र 'मधल्या गप्पा व्हिडिओवर पाहता येतील.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी