• गप्पा शिवराज गोर्लेंशी

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Jan 1, 2009 04:30 AM IST | Updated On: Jan 1, 2009 04:30 AM IST

    प्रसिद्ध लेखक शिवराज गोर्ले ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये आले होते. त्यांच्या ' मजेत जगावं कसं? ' या पुस्तकाची पहिली आवृत्ती केवळ 9 दिवसात संपली. हा मराठी साहित्य विश्वात एक विक्रम मानला जातो. त्यानंतर माणसं जोडावी कशी? ,स्त्री विरुद्ध पुरूष,सुजाण पालक व्हावं कसं? ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. नाटक आणि चित्रपटासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ज्यामध्ये ' थरथराट ', ' चिमणी पाखरं ' हे चित्रपट तर ' कुर्यात सदा टिंगलम्,गोलमाल ही नाटकं प्रसिद्ध आहेत.त्यांच्या नग आणि नमुने या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालाय.तर मजेत जगावं कसं या पुस्तकाला महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचा पुरस्कार मिळालाय.मस्त रहावं कसं हे त्यांचं आगामी पुस्तक आहे. सलाम महाराष्ट्र 'मध्ये शिवराज गोर्ले यांनी नवीन वर्ष सुखाचं कसं घालवावं, याचे महत्त्वपूर्ण फंडे सांगितले. आनंदात राहणं तसं खूप सोपं असतं पण आपण ते कठीण करून ठेवतो. कारण साधं सोपं राहणं हे खूपच अपघड असतं. कितीही यश मिळो, कितीही मदत मिळो आपले पाय हे नेहमीच जमिनीवर राहिले पाहिजेत. आपल्या यशामध्ये अनेकांचा वाटा असतो, याची जाणीव असली पाहिजे. त्याबद्दल नम्रता असायला पाहिजे, कृतज्ञता असली पाहिजे. जगात निरनिराळ्या प्रकारचे स्वार्थ असतात. पण शिवराज गोर्ले यांनी भावनिक स्वार्थी व्हायला सांगितलं. भावनिक स्वार्थ म्हणजे एखाद्याला आपण मदत करतो. पण जेव्हा त्या केलेल्या मदतीची परत केली जाते, त्यातून आपल्याला जो आनंद मिळतो, याला भावनिक स्वार्थ म्हणातत. शिवराज गोर्ले यांनी भावनिक स्वार्थाचं चांगलं उदाहरण सांगितलं - समजा, आपण एखाद्या गरीब मुलाला मदत करतो. त्या गरीब मुलाला परीक्षेत चांगले मार्क मिळाल्यावर तो आपल्याला पेढे द्यायला येतो. तो पेढे देत असताना आपल्याला आनंद होतो. या आनंदालाच भावनिक स्वार्थ म्हणतात. सदैव आनंदाशी कनेक्ट राहण्याचा शिवराज गोर्ले यांनी सल्ला दिला. ते सांगतात आनंद हा आपल्या आसपास आसतो. तो कसा अनुभवायचा ते आपल्याकडे असतं. यशाला शिखर न समजता याशाची सफर अनुभवयाचाही मोलाचा सल्ला त्यांनी दिला. यशाच्या सफरीतूनच आपल्याला भरपूर काही शिकायला मिळतं. कल्पनेला स्वत:ची श्रीमंती आणि संपत्ती समजा, असंही त्यांनी सांंगितलं. कारण या कल्पनेतून आपल्याला भरपूर पैसा मिळतो. कल्पनेने समृद्ध असणा-या माणसांना मरण कधीच नसतं, असं शिवराज गोर्ले यांचं मत आहे. सलाम महाराष्ट्र 'मध्ये लोकांचे निरनिराळे संकल्प ऐकायला मिळाले. शिवराज गोर्लेंच्या गप्पा आणि लोकांचे अनुभव व्हिडिओवर पाहता येतील.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी