S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • बॅरिस्टर अ.र.अंतुले यांच्या विधानामुळे काँग्रेसचं न भरून येणारं नुकसान झालंय का ? (भाग : 3)
  • बॅरिस्टर अ.र.अंतुले यांच्या विधानामुळे काँग्रेसचं न भरून येणारं नुकसान झालंय का ? (भाग : 3)

    Published On: Dec 24, 2008 06:57 AM IST | Updated On: Dec 24, 2008 06:57 AM IST

    मुंबईवरच्या 26 / 11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश दहशतवादाचा सामना करण्यासाठी एकत्र आला होता. पण केंद्रातले अल्पसंख्यांकमंत्री बॅरिस्टर अ.र. अंतुले यांनी एटीएस प्रमख हेमंत करकरे आणि त्यांच्या सहका-यांच्या बलिदानाविरुद्ध विधान करून संपूर्ण देशाच्या एकीला बट्टा लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अंतुले वादळात सापडलेले होते. ' चुकणे हा मनुष्यस्वभाव आहे,' अशा शब्दांत पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी अंतुले प्रकरणावर आज पडदा टाकला आहे. अंतुले यांना त्यांच्या पदावरून बडतर्फ न करता मुस्लिम समाजाला संतुष्ट ठेवणं आणि अंतुलेंच्या वादग्रस्त विधानाचं खंडन करत देशातल्या गदारोळाला शांत करण्याचं कसब पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी चांगलंच साधलं आहे. अंतुलेंच्या ' यु टर्न 'वर ' आजचा सवाल ' होता. बॅरिस्टर अ.र. अंतुले यांच्या विधानामुळे काँग्रेसचं न भरून येणारं नुकसान झालंय का ? या 'आजच्या सवाल 'मध्ये चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ, ज्येष्ठ विचारवंत अब्दुल कादर मुकादम, खासदार भारतकुमार राऊत या नामवंत पाहुण्याचा समावेश होता. आजच्या सवाल 'मध्ये अंतुले केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री असूनंही त्यांनी असं विधान करणं योग्य होतं का ? त्यांनी हे विधान करताना काही पुरावे तपासले होते का ? की फक्त मतांचं राजकारण करण्यासाठी अंतुलेंनी त्यांची खेळी केली ? अंतुले यांच्या विधानामुळे देशातल्या सेक्युलर चळवळीच काही नुकसान झालंय का ? अंतुलेंच्या या विधानामुळे पाकिस्तानची मदत झालेली आहे का? अशा निरनिराळ्या मुद्द्यांवरून चर्चा झाली. आजच्या सवाल ' मध्ये शिवसेनेचे खासदार भारतकुमार राऊत यांनी अंतुलेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. ते म्हणाले , " पंतप्रधानांच्या प्रामाणिकपणावर आमचा विश्वास आहे आणि त्यांच्या सद्सद्विवेकबुद्धीवरही आमची निष्ठा आहे. पण जोपर्यंत अंतुले स्वत:हून माफी मागत नाही, तसंच पंतप्रधान अंतुलेंकडे राजीनामा मागत नाहीत, अंतुले राजीनामा देत नसल्यास पंतप्रधान त्यांना बडतर्फ करत नाहीत तोपर्यंत शिवसेनेचं आणि भारतीय जनतेचं समाधान होणार नाही. आमचं आंदोलन असंच चालू राहणार आहे. " ज्येष्ठ विचारवंत अब्दुल कादर मुकादम यांनी अंतुलेंच्या राजीनाम्याची काहीच गरज नव्हती, या आपल्या मताचा खुलासा करताना ते म्हणाले, " अंतुलेंनी गैरकृत्य केल्याचं मला मान्य नाही आहे.किंवा त्यांना देशद्रोही करण्याइतपत त्यांनी गुन्हा केला नाहीये. अंतुलेंची शंका आहे. ती शंका खरी असेल, खोटी असेल हा भाग वेगळा. राजीनामा देण्याची काही गरजच नाहीये. आपल्य मनात असणारी शंका विचारण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. " मात्र ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ अब्दुल कादर मुकादमांच्या विचारांशी सहमत नाहीत. " पंतप्रधानांचं विधान होतं की, वादावर पडदा पडला... पण मला असं वाटतं की वाद होण्याचं काही कारण नव्हतं. पण अंतुलेंनी निव्वळ त्यांच्या क्षुद्र व्यक्तिगत स्वार्थापोटी हा वाद उकरून काढला आहे. काँग्रेस पक्ष हतबल आणि नेतृत्त्वहीन झाला आहे. त्यात पंतप्रधान नोकरशहा असल्याप्रमाणं वागत असल्यामुळे त्यांचा पक्षावरच काय पण मंत्रिमंडळावरही वचक नाहीये. या प्रकरणानं सोनिया गांधी यांच्या कळण्याच्या कुवतीवर शंका घेतली जात आहे. सामान्य माणूस आणि अंतुले यांच्यामध्ये फरक आहे. अंतुले केंद्राचे मंत्री आहेत. देशाचे गृहमंत्री संसदेत सांगत आहेत की, पाकिस्तानमुळे हल्ला झालेला आहे, पाकिस्तानचा माणूस त्यात सापडला आहे, तेव्हा अंतुलेंनी हे बोलायचं काय कारण होतं? त्यांची शंका त्यांनी जाहीररित्या सांगायची काय गरज होती. खाजगीत सांगायचं होतं, बाहेर पत्रकारांशी बोलायचं काय कारण होतं. अंतुले हे असं बोलल्यावर काही तासांच्या अवधीत पंतप्रधानांनी त्यांना बडतर्फ करून मंत्रिमंडळातून त्यांची हाकलपट्टी करायला हवी होती. देशात असं घाणेरडं आणि विघातक राजकारण आम्ही चालू देणार नाही, या अर्थाचा सगळ्यांना एकप्रकारे धडा मिळाला असता. 26/11 जे झालं त्याविरुद्ध देश ज्या एकमुखानं दहशतवादाविरूद्ध लढायला उभा राहिला होता, त्याला बट्टा लावण्याचं काम अंतुलेंच्या विधानांनी केलं आहे. अंतुलेंनी मतांचं राजकारण करण्यासाठी बेजबाबदारपणा केला आहे. त्याचा फटका काँग्रेसला बसेलही, " असं प्रकाश बाळ चर्चेत म्हणाले.बॅरिस्टर अ.र. अंतुले यांच्या विधानामुळे काँग्रेसचं न भरून येणारं नुकसान झालंय का ? या 'आजच्या सवाल 'वर 83 टक्के लोकांनी ' होय ' असं मत नोंदवलं आहे. चर्चेचा शेवट करताना ' आयबीएन लोकमत 'चे संपादक निखिल वागळे म्हणाले, " सगळा समाज एकत्र येऊन दहशतवादाविरूद्ध लढायचं म्हणत आहे. पण राजकारण्यांना आपण काय करतोय याचं भान नाही आहे. त्यांची एकमेकांवर चिखलफेक चालली आहे. आपण त्यांना सगळ्यांनी हे ताबडतोब थांबवा असं सांगायला हवं आहे. दहशतवादाचा राक्षस अधिकाधिक क्रूर होत आहे त्यांना ताबडतोब रोखायला हवं. अंतुलेंनी फक्त काँग्रेसचंच नाही तर देशाचं, सेक्युलॅरिझमचं नुकसान केलं आहे. "

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close