• होम
  • व्हिडिओ
  • आणीबाणी जाहीर करण्याची शिवसेनाप्रमुखांची मागणी योग्य आहे का ? (भाग : 2)
  • आणीबाणी जाहीर करण्याची शिवसेनाप्रमुखांची मागणी योग्य आहे का ? (भाग : 2)

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Dec 23, 2008 05:10 AM IST | Updated On: Dec 23, 2008 05:10 AM IST

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ' सामना ' या सेनेच्या मुखपत्रात मुलाखत छापून आली आहे. सेनाप्रमुखांची मुलाखत ही जहाल आहे. या मुलाखतीत सरकारला शिवसेनाप्रमुखांनी नार्मद म्हंटलं आहे. जे शब्द एरवी छापले जात नाहीत, असे शब्दही त्या मुलाखतीत छापलेले आहेत. शिवाय देशामध्ये सरकारनं ताबडतोब आणीबाणी जाहीर करावी आणि पाकिस्तानला धडा शिकवाव, असंही ठाकरे यांनी मुलाखतीत म्हटलं आहे. शिवसेनाप्रमुखांच्या ' सामना ' मधल्या वादग्रस्त मुलाखतीवर 'आजचा सवाल ' होता - आणीबाणी जाहीर करण्याची शिवसेनाप्रमुखांची मागणी योग्य आहे का ? या ' आजच्या सवाल 'मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हुसेन दलवाई, शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत , कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो या नामवंत पाहुण्याचा समावेश होता. शिवसेनाप्रमुखांची ' सामना 'मध्ये छापून आलेल्या मुलाखतीचं समर्थन शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी केलं. संजय राऊत शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या मुलाखतीमागची त्यांची भूमिका स्पष्ट करताना म्हणाले, " देशामध्ये ज्या प्रकारचं वातावरण आहे, जनतेचा सरकारवर, शासनावर आणि राज्यकर्ते असा कोणावरही विश्वास नाहीये. लष्कर देशाचं रक्षण करेल अशीच परिस्थिती देशात आहे. श्‍विसेना प्रमुखांची मागणी योग्य आहे. उलट ती जरा सौम्यच म्हणावी लागेल. देश कठीण प्रसंगातून जात आहे, कोणाचा पायपोस कोणाला नाहीये. पंतप्रधान काय म्हणतायत ते त्यांचं त्यांना कळत नाहीये. देशामध्ये हंगामा चाललेला आहे. लोकसभेत गोंधळ सुरू आहे. संसदेतही तोच प्रकारआहे. संपूर्ण देश एका अराजकतेच्या, अस्थिरतेच्या वाटेनं जात असताना कुठेतरी देशाल शिस्त लावण्यासाठी देशावर आणीबाणी लागावी, या देशामध्ये ख-या अर्थानं शिस्तीचं पर्व सुरू रहावं, त्यासाठी देश लष्कराच्या ताब्यात जावा असं जर बाळासाहेबांना वाटलं तर ते चुकीचं नाहीये. " बाळासाहेबांच्या भूमिकेशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हुसेन दलवाई सहमत नाहीत. हुसेन दलवाई म्हणतात, " बाळासाहेबांनी शिवसेना स्थापल्यापासून त्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे, असं त्यांनी वारंवार सांगितलं आहे. आणि अशा नेत्याकडून देशात लष्कराची सत्ता असवी,अशी मागणी होणं आक्षेपार्ह आहे. आणीबाणी आल्यावर देश नीट चालेल, देशाला शिस्त लागेल, असं शिवसेनाप्रमुरख्रांना वाटत असेल तर ते चूक आहे. लष्कर आपल्या दोन शेजारच्या देशांत आहे. बांगला देश आणि पाकिस्तानात लष्करानं काय दिवे लावले आहेत ते आपण पाहत आहोत. त्यामानानं भारतात लोकशाही रुजलेली आहे ती चांगली आहे. भारताच्या स्वातंत्र्याला 61 वर्षं होऊनही लोकशाहीमध्ये चाललेलं भारताचं राज्य चांगलं आहे. युतीचं राज्य होतं तेव्हाच संसदेवर हल्ला झाला होता. आणि तो जर यशस्वी झाला असता तर किती खासदारांचे जीव गेले असते, त्याची कल्पना करवत नाही. त्यामानानं आमचं काँग्रेस सरकार बरच कार्यक्षम आहे." आगामी लोकसभेच्या निवडणुका पाहता शिवसेनाप्रमुखांनी वादळ उठवल्याचं कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो यांचं म्हणणं आहे. चर्चेत कांगो म्हणाले, " बाळासाहेब ठाकरेंचं लोकशाही प्रेम सर्वज्ञात आहे. लोकशाहीचे फायदे घ्यायचे आणि लोकशाही उपयोगाची नाही, असं म्हणणा-यांमध्ये त्यांचस अव्वल नंबर आहे. त्यांनी आणीबाणी आणा म्हणणं यात आश्चर्य असं काहीच नाहीये. त्यांचं लक्ष्य येणा-या निवडणुकांकडे आहे. हा निवडणूक स्टन्ट आहे. सध्याचं सरकार नालायक आहे, असं म्हणत त्याला लोकशाही संस्कृतीत बसणार नाहीत अशा शिव्या द्यायच्या, ही कसली सभ्यता ? असा प्रश्न त्यांनी चर्चेत विचारला. ' लोकांना भडकावायचं आणि सांगायचं की आम्हीच तुम्हाला वाचवू हा खेळ शिवसेनाप्रमुख खेळतायत आणि त्यांची वक्त्व्य या खेळाचाच एक भाग आहेत, ' असंही भालचंद्र कांगो म्हणाले. आणीबाणी जाहीर करण्याची शिवसेनाप्रमुखांची मागणी योग्य आहे का ? या 'आजचा सवाल ' वर 89 टक्के लोकांनी होय असा कौल दिला. चर्चेचा शेवट करताना आयबीएन - लोकमतचे एडिटर निखिल वागळे म्हणाले, " सामनाला मेगा मुलाखत देऊन जो हेतू साध्यकरायचा होता तो साध्य झाला आहे. या मुलाखतीमुळे उठलेलं वादळ जबदस्त आहे. अत्यंत प्रखर अशी मतं बाळासाहेब व्यक्त करणार आहे, असं चर्चेत संजय राऊत म्हणाले. त्या मतांची मी वाट बघत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत यावं लागेल असं सुचकतेनं म्हणत चर्चेचा शेवट केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी