• गप्पा विजय गटलेवारशी (भाग : 2 )

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Dec 22, 2008 06:21 AM IST | Updated On: Dec 22, 2008 06:21 AM IST

    झी मराठीवरून 2005 साली सुरू झालेलं 'सारेगमप 'चं पहिलं सत्र आठवतंय... अनघा ढोमसे, अभिजीत कोसंबी, संतवाणी गाण्यात माहीर असलेला ज्ञानेश्वर मेश्राम यांच्याबरोबरचा विदर्भचा स्पर्धक विजय गटलेवार याचा 'सारेगमप 'मधला प्रवास अजूनही चांगलाच लक्षात आहे. कॉलबॅक एपिसोडमध्ये परत येऊनही विजयचा ' विजय ' झाला नाही. पण आता तोच विजय गटलेवार यशस्वी गझल गायक म्हणून नावारुपास आला आहे. तोच विजय गटलेवार ' सलाम महाराष्ट्र ' आला होता. त्याच्या संगीताच्या प्रवासाविषयी ऐकायला मिळालं.सारेगमच्या माध्यमातून विजय गटलेवार महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला आहे. सुगम संगीतामध्ये त्याची गझलवर हुकुमत आहे. त्याचा ' कुंडली 'हा गझल अल्बम प्रसिद्ध झाला आहे. ' हमने जिना सिख लिया ', ' बेलगाम ', ' कलंक ' या चित्रपटांसाठीही त्यानं गाणी गायली आहेत. ' तारक मेहता का उलटा चष्मा ' या सिरीयलसाठी त्यानं पार्श्वगायनही केलं आहे. ' गजलसरा ' या हिंदी -उर्दू गझलच्या कार्यक्रमामध्ये तो अंतिम फेरीचा विजेता होता. नुकताच त्याचा ' करार केला ' हा मराठी गझलांचा अल्बम प्रसिद्ध झाला आहे. सलाम महाराष्ट्र 'मध्ये त्यानं गप्पांची सुरुवात ' अें सनम आँखों को मेरे खुबसुरत साज दे...' ही शायर इलाही जमादार यांची उर्दू मिश्रीत मराठी गझल गाऊन केली आहे. एक ओळ हिंदी आणि एक ओळ मराठीत अशी गझलची गुंफण करून मराठीत गजल आणण्याचा अनोखा प्रयोग शायर इलाही जमादार यांनी केला आहे. त्यांच्यामुळेच विजय त्याचा स्वत:चा मराठी गझलांचा अल्बम् काढू शकलाये. विजय त्याच्या मराठी गजलांच्या अल्बम्‌बाबत सांगतो, " 'सारेगमप 'मध्ये मला शायर इलाही जमादार यांनी सुगम संगीत गाताना ऐकलं होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की, मी सुगम संगीतात गझल चांगली गाऊ शकतो. कारण गझल गाण्यात माझं चांगलं वकुब आहे. ' मी जर गझल गायल्या तर त्यांनी त्यांचं सगळं साहित्य माझ्या नावं करण्याची तयारीही दाखवली. त्यांच्यामुळेच मी स्वत:ला गझल गायकीत वाहून घेतलं आहे. ' करार केला ' या मराठी गझलांच्याअल्बम् मधल्या सगळ्या गझल शायर इलाही जमादार यांनी लिहिलेल्या आहेत. गझल गाण्याचं माझ्या अनेक वर्षांपासून मनात होतं. शायर इलाही जमादारांमुळे मी त्या गायल्याही. पण विदर्भात मी उस्ताद अहमद हुसेन मेहंदी यांची गझल गायकी मी ऐकली होती. मला आवडली होती. हे रुटीन पद्धतीचं गाणं नाहीये हेही यात सूर लावण्याची काही वेगळी पद्धत आहे. मला हे नेहमी आवडायचं. तेव्हा आमच्या विदर्भात ही गझल कोण गात नव्हतं. त्यांच्या आवजाची लपक माझ्यातही आहे हे माझ्या लक्षात आलं. मी त्यांच्या गायकीचा जवळजवळ 7 ते 8 वर्षं अभ्यास केला. तोही कॅसेटवरून. तेव्हा मला वाटलं होतं की मराठीमध्ये हा गझलचा प्रकार आणला पाहिजे. मी जयपूमध्ये त्यांच्याकडून गझल शिकलो. पण शायर इलाही जमादारांमुळे हिंदी-उर्दू- मराठी गझल मराठीत आणल्यात. "' सलाम महाराष्ट्र ' मध्ये विजय गटलेवारनं गायलेल्या गझल व्हिडिओवर ऐकता येतील.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी