• गप्पा संजू हिंगेंशी (भाग : 2 )

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Dec 19, 2008 07:32 AM IST | Updated On: Dec 19, 2008 07:32 AM IST

    गेल्या वीस वर्षांपासून कमर्शिअल फोटोग्राफीत रमलेले फोटोग्राफर संजय हिंगे ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये आले होते. अनेक मोठमोठ्या ब्रॅण्डससाठी त्यांनी फोटोग्राफी केली आहे. पण त्यांची खरी ओळख होते ती त्यांच्या पुस्तकांमधून. त्यातही कॉफी टेबल बुक हा अभिनव प्रकार हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. ' सलाम महाराष्ट्र ' त्यांनी त्यांच्या फोटोग्राफीच्या अनुभवांबद्दल सांगितलं. आँखे तो सबको होती हैं, मगर नजर नही होती है...' असं एका कवीनं म्हटलं आहे. आणि ते छायाचित्रकार संजू हिंगे यांना अगदी तंतोतंत लागू पडतं. फोटोग्राफी करताना कॅमे-याची मर्यादा पडते, हे संजू हिंगे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी कॉम्प्युटरचा वापर करून निरनिराळे प्रयोग करायला सुरुवात केली. त्यातूनच त्यांनी अस्तित्चात आली ती कॉफी टेबल्स आणि टेबल टॉप्स. त्याचाही प्रवास त्यांनी ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये सांगितला. कमर्शिल फोटोग्राफीविषयीचे संजू हिंगेंचे अनुभव व्हिडिओवर पाहता येतील.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी