S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीमुळे काँग्रेसचे बळ वाढलंय का ? - भाग 2
  • पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीमुळे काँग्रेसचे बळ वाढलंय का ? - भाग 2

    Published On: Dec 9, 2008 01:45 PM IST | Updated On: Dec 9, 2008 01:45 PM IST

    पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. काँग्रेस की भाजप बाजी मारणार, हा मुद्दा चर्चेत होता. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचं सावट ही या निवडणुकांवर होतं. काँग्रेसला या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत फटका सहन करावा लागेल, असं चित्र निर्माण झालं होतं. निवडणुकींच्या निकालाचं चित्र मात्र वेगळं होतं. दिल्ली, मिझोराम आणि राजस्थानमध्ये काँगेसनं बाजी मारली तर केवळ मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच भाजपला राखता आलं. यावरच होता आजचा सवाल. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीमुळे काँग्रेसचे बळ वाढलंय का ? या चर्चेत काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ, पत्रकार हेमंत देसाई आणि भाजपचे नेते नितीन गडकरी सहभागी झाले होते.विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या यश-अपयशाची चिकित्सा करताना नितीन गडकरी म्हणाले की राजस्थानातील पक्षीय बंडखोरीमुळे आमचा पराभव झाला. दहशतवादाचा प्रश्न हा केंद्रांचा आहे. राज्यातील हा प्रश्नच होऊ शकत नाही. यावेळीविकासाच्या मुद्यावर लोकांनी मतं दिली असल्याचं स्पष्ट झालं आहे. यावर पत्रकार हेमंत देसाई म्हणाले, निवडणुकीआधी काँग्रेस निराशाग्रस्त होता तर भाजपला अति आत्मविश्वास होता. काँगेसला अपेक्षा कमी तर भाजपला जास्त होत्या. यावेळच्या निवडणुकीत स्वच्छ प्रतिमेचे नेते आणि स्वच्छ कारभारालाच जनतेनं प्राधान्य दिलंय. चांगलं काम केलं तरच यापुढे मत मिळणार, हे या निवडणुकीनं दाखवून दिलंय 'या निवडणुकीतील विजयानं काँग्रेसनं हुरळुन जावू नये, सल्ला गडकरींनी काँगेसला दिला. 'विजयाचे अनेक बाप असतात पण पराभवाला कोणीच वाली नसतो. त्या राज्यातील विकास आणि मुख्यमंत्र्यांचं व्यक्तिमत्व पाहून मतदारांनी मतं दिलीत. ही मतं काँग्रेसच्या बाजूनं दिलेली नाहीत ', असं गडकरी म्हणाले. या निवडणुकीत राहुल गांधींचं उदयास आलेल्या नेतृत्वाबद्दल चर्चा झाली. ' काँग्रेसनं या निवडणुकीत नव्या चेहर्‍यांना उमेदवारी दिली आहे. राहुल गांधींमुळे निवडणुकीत जादू झाली असं मी म्हणणार नाही पण एक परिवर्तन झालं ' असं गाडगीळ म्हणाले. यावर गडकरी म्हणाले, याआधी राहुल गांधींनी प्रचाराची धुरा सांभाळलेल्या उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात काँगेसचा पराभव का झाला ? खरी गोष्ट ही 21 व्या शतकांचं राजकारण वेगळं आहे. हेही मान्य की नवा चेहरा जनतेला हवाय. सध्याचं राजकारणच मुळी विकासाभोवती फिरतंय. जनतेच्या मनातून जात गेलेली आहे पण पुढार्‍याच्या मनातून जात गेलेली नाही. शिवाय काँग्रेसची परंपरागत व्होट बँक आहे ', असं गडकरी म्हणाले.पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीमुळे काँग्रेसचे बळ वाढलंय का ? या पोलमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नावर 79 टक्के लोकांनी ' नाही ' असं मत नोंदवलं. चर्चेचा शेवट करताना आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे म्हणाले की या निव्डणुकीतून काँग्रेसला बळ मिळालं असलं तरी त्यांनी ही बेसावध राहता कामा नये. भाजपनंही बेसावध राहता कामा नये. मतदाराला गृहित धरता कामा नये. पुढच्या निवडणुकीत मतदार काय निर्णय घेतील, हे सांगता येत नाही. जनतेच्यावतीनं ही ...ग बेल आहे. तेव्हा जनतेचा विचार करत रहा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close