S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • मुख्यमंत्री निवडीच्या घोळामुळे जनतेच्या जखमेवर मीठ चोळलं गेलंय का ? - भाग 3
  • मुख्यमंत्री निवडीच्या घोळामुळे जनतेच्या जखमेवर मीठ चोळलं गेलंय का ? - भाग 3

    आईबीएन लोकमत | Published On: Dec 6, 2008 03:02 PM IST | Updated On: Dec 6, 2008 03:02 PM IST

    मुंबईवर हल्ला करणार्‍या दहशतवाद्यांचा खात्मा 60 तासांच्या कारवाईत एनएसजी कमांडो आणि लष्कारानं केला. पण त्यानंतर सुरू झालेलं राजकीय नाट्य संपता संपत नव्हतं. दहशतवादी हल्ल्यातून सावरलेल्या मुंबईत केंद्रीय परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी आणि संरक्षण मंत्री ए.के.अ‍ॅन्टोनी आले. पण ते आले महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी. देशावर संकट आलं असताना या महत्त्वाच्या व्यक्ती मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार शोधत होते. यावरच होता आजचा सवाल. मुख्यमंत्री निवडीच्या घोळामुळे जनतेच्या जखमेवर मीठ चोळलं गेलंय का ?. यावर बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, काँग्रेस आमदार जयप्रकाश छाजेड, ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे आणि भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्याचं मेधा पाटकर म्हणाल्या.' दहशतवादाचा सामना प्यादी बदलून काही होणार नाही तर व्यवस्था परिवर्तनाची गरज आहे ', मुख्यमंत्री निवडीच्या काँग्रेसच्या घोळावर भाजपचे आमदार देवेंद्र फडवणीस म्हणाले, ' काँग्रेसनं हा राजकीय तमाशा उभा केला आहे. हा संवेदनहीन पक्ष झाला आहे. राजीनामा देण्याकरता काँगेसच्या नेत्यांना तीन दिवसानंतर नैतिकता आठवली. दहशतवादाशी मुकाबला करायचं सोडून सर्व मंत्री मुंबईत नेतानिवडीत मग्न होते. हे राजकीय दुर्देव आहे '.फडवणीस यांनी केलेला आरोप छाजेड यांनी अमान्य केला. ' नैतिकता ही फक्त काँग्रेसची जबाबदारी आहे. काँग्रेसमध्ये जबाबदारी स्वीकारण्याची परंपरा राहिली आहे ', असं छाजेड यांनी सांगितलं. यावर फडवणीस म्हणाले, देशात युद्धजन्यस्थिती उद्भवली आहे. जनक्षोभ उसळला असताना परिस्थितीनुरुप निर्णय घेतला पाहिजे. नैतिकता होती ना मग लागलीच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा का दिला नाही काँग्रेसनं जनतेची माफी मागतिली पाहिजे'.सर्वच राजकीय पक्षांमध्ये असंवेदनशीलता आली आहे का ? या आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांच्या प्रश्नाला उत्तरदेताना मेधा पाटकर म्हणाल्या, दहशतवादाला सामोरं जाताना जनतेमध्ये आत्मविश्वास आणि एकतेची भावनेची निर्माण करण्याचीगरज आहे पण यात सांप्रदायिकता अडचण आहे. जातीवाद आणि प्रांतवाद मोडून काढणारे राजकीय पक्षच नव्हे तर जनसमूह,जनआंदोलनाची गरज आहे. जनतेच्या प्रश्नाविषयी राजकीय पक्षांमध्येच एकूण व्यवस्थेमध्ये असंवेदनशीलता आहे '. याबाबत ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे म्हणाले, राजकीय पक्षांमध्ये संयम आणि सहिष्णुतेचा अभाव आहे. गांधीचा वारसा सांगणार्‍या पक्षाचीशोकांतिका झाली आहे 'यावर पर्याय सांगताना अरुण खोरे यांनी कार्यक्षम नेत्याला परत बोलवण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, हा मुद्दा मांडला तर फडवणीस यांनी सुशिक्षित मतदारांमध्ये उदासीनता असल्याचं सांगितलं. मुख्यमंत्री निवडीच्या घोळामुळे जनतेच्या जखमेवर मीठ चोळलं गेलंय का ? या पोलमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नावर 95 टक्के लोकांनी 'हो' असं मत नोंदवलं. चर्चेचा शेवट करताना निखिल वागळे म्हणाले की समाजातील सर्व घटकांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. एकमेकांवर दोषारोप थांबवले पाहिजे. नवं नेतृत्व शोधलं पाहिजे तसं होत नसेल तर स्वत: नेतृत्व करू शकतो का ? याचा विचार केला पाहिजे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close