• होम
  • व्हिडिओ
  • मंत्र्यांचे राजीनामे हे एक राजकीय नाटक आहे का ? भाग- 1
  • मंत्र्यांचे राजीनामे हे एक राजकीय नाटक आहे का ? भाग- 1

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Dec 2, 2008 01:25 PM IST | Updated On: Dec 2, 2008 01:25 PM IST

    मुंबईवरील दहशतवादी हल्ला रोखण्यात अपयशी ठरलेलं काँग्रेस- राष्ट्रवादीचं आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. अतिरेक्यांच्या संभाव्य हल्ल्याबाबत केंद्र सरकारनं पूर्वसूचना देऊनही सरकारनं कोणतीही पावलं उचलली नसल्याबद्दल सरकारवर जोरदार टीका होत आहे.या दहशतवादी हल्ल्याची नैतिक जबाबदारस्वीकारत एकापाठोपाठ राजीनामे दिले जात आहेत. केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील, गृहमंत्री आर.आर.पाटील आणि मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राजीनामे दिले आहेत. यावरच होता आजचा सवाल. प्रश्न होता, मंत्र्यांचे राजीनामे हे एक राजकीय नाटक आहे का ?. यावरील चर्चेत बोलण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष हुसेन दलवाई, दै. लोकमत च्या पुणे आवृत्तीचे संपादक अनंत दीक्षित, भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि चित्रपट- निर्माता अशोक पंडित सहभागी झाले होते. चर्चेच्या सुरुवातीला अनंत दीक्षित म्हणाले की, आर.आर. पाटील हे ग्रामीण भागातील नेतृत्व आहे. त्यांनी दिलेला राजीनामा नैतिकतेसाठी दिलाय, असं मला वाटत नाही. राजीनाम्यानं हे प्रश्न सुटणार नाहीत. हा धोरणात्मक बेजबाबदारपणा आहे. एवढा मोठा हल्ला झालेला असताना प्रशासकीय निर्णय कसे घेतले गेले, याबाबतची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. सरकार 100 टक्के अपयशी ठरलंय पण पोलिसांनी उत्तमरित्या परिस्थिती हाताळली. सरकारच्यावतीनं हुसेन दलवाई यांनी सरकारची बाजू मांडली. ' सरकारनं जबाबदारी स्वीकारली आहे. हा हल्ला एवढा मोठा असेल, त्याचं आकलन सुरुवातीला कोणालाच झालं नाही. चुका झाल्या हे मान्य आहे.पण मुख्यमंत्र्यांनी कोणीही स्वता:हून राजीनामा देण्यास सांगितल नाही. त्यांनी स्वता:हून पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा पाठवला आहे ', असं दलवाई म्हणाले.या हल्ल्यामुळे राज्य सरकारच्या विरोधात सर्वसामान्यांमध्ये संताप उफाळून आला आहे. राजीनामे देऊन प्रश्न सुटणार आहेत का, असा सवाल लोकांकडून विचारला जात आहे. यावर अनंत दीक्षित म्हणाले, लोकक्षाभ शून्यातून निर्माण होत नाही. त्याला कारणं असतात. नीतीमत्तेची कारण सांगत राजीनामे दिले गेले पण राजकीय पडझडीमुळे प्रश्न सुटणार नाहीत. यंत्रणेची तसंच कायद्याची पुर्नरचना केली पाहिजे '. सरकारच्या अकार्यक्षमतेबद्दल बोलताना नितीन गडकरी म्हणाले, केंद्र सरकारनं कळवनूही राज्य सरकारनं दुर्लक्ष केलं. पोलिसांकडे आधुनिक बुलेट प्रुफ जॅकेट तसंच अत्याधुनिक बंदुका नाही. सरकारजवळ पैसा नाही का?'. दरम्यान, हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारुनच राजीनामे दिले गेले आहेत.यामागे कोणतंही राजकीय नाटक नाही, असं दलवाई म्हणाले. नितीन गडकरींनी लोकांमध्ये राजकीय विश्वासर्हतेचा वाढवणं गरजेचं असल्याचा मुद्दा मांडला. मंत्र्यांचे राजीनामे हे एक राजकीय नाटक आहे का ? या पोलमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नावर 98 टक्के लोकांनी ' हो ' असं मत नोंदवलं. चर्चेचा शेवट करताना आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे म्हणाले की राजकीय नेत्यांनी दहशतवादाचं राजकारण करू नये आणि केलंच तर पुढच्या निवडणुकीत धर्म, जात, दहशतवादाच्या नावावर मतं देणार नाही. जनता सत्ता देते ती त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी. ती नीट राबवा. बेजबाबदारपणा करू नका.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी