• गोष्ट पडद्यामागची (भाग - 1)

    आईबीएन लोकमत | Published On: Nov 21, 2008 08:11 AM IST | Updated On: Nov 21, 2008 08:11 AM IST

    21 नोव्हेंबर हा ' वर्ल्ड टेलिव्हिजन डे ' म्हणून ओळखला जातो. यानिमित्तानं ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये घडली ती आमच्या संपूर्ण 'आयबीएन - लोकमत 'च्या मुंबईतल्या विक्रोळीमधल्या कार्यालयाची सफर. टीव्हीवरून कोणताही कार्यक्रम, बातमी प्रेक्षकांपर्यंत फक्त वृत्तनिवेदक, सूत्रसंचालक पोहोचवत नाहीत. तर कॅमेरामन, साऊण्ड इंजिनिअर, लाइट्समन, ग्राफिक आर्टिस्ट, स्टुडिओ हेड, व्हिज्युअल आर्टिस्ट, प्रोड्युसर, लायब्ररी डिपार्टमेंट, मेकअप आर्टिस्ट, ड्रेसआर्टिस्ट अशा सगळ्यांची एक भली मोठी मोठी टीम असते. ही टीम बातम्या, कार्यक्रम ऑन एअर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचंड मेहनत करत असते. या सा-यांच्या मेहनतीची फळं म्हणजे ' ग्रेट भेट ', ' टेक ऑफ ', 'रिपोर्ताज ', ' युथ ट्युब ', ' पहिला गजर ', ' सकाळच्या बातम्या ', ' सलाम महाराष्ट्र ', ' दुपारच्या बातम्या ' , ' टॉक टाइम ', ' टी टाइम ', ' संध्याकाळच्या बातम्या ', ' महाराष्ट्र नामा ', 'स्पॉट लाईट ', ' मेगा बातमी ' , ' स्पोर्ट टाइम ', ' प्राइम टाइम ', 'आजचा सवाल ', शो टाइम, ' मेट्रो मीटर, ' ' रात्रीच्या बातम्या ' हे आणि असे अनेक कार्यक्रम. यांच्या कामाची पद्धत आणि वेग भल्याभल्यांना गार करतो. या सगळ्या कलाकारांची, त्यांच्या कामाची आणि कष्टाची ओळख रिपोर्टर प्रियांका देसाईने ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये करून दिली. ती तुम्हाला व्हिडिओवर पाहता येईल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close