• गोष्ट पडद्यामागची (भाग - 3)

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Nov 21, 2008 08:01 AM IST | Updated On: Nov 21, 2008 08:01 AM IST

    21 नोव्हेंबर हा ' वर्ल्ड टेलिव्हिजन डे ' म्हणून ओळखला जातो. यानिमित्तानं ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये घडली ती आमच्या संपूर्ण 'आयबीएन - लोकमत 'च्या मुंबईतल्या विक्रोळीमधल्या कार्यालयाची सफर. टीव्हीवरून कोणताही कार्यक्रम, बातमी प्रेक्षकांपर्यंत फक्त वृत्तनिवेदक, सूत्रसंचालक पोहोचवत नाहीत. तर कॅमेरामन, साऊण्ड इंजिनिअर, लाइट्समन, ग्राफिक आर्टिस्ट, स्टुडिओ हेड, व्हिज्युअल आर्टिस्ट, प्रोड्युसर, लायब्ररी डिपार्टमेंट , मेकअप आर्टिस्ट, ड्रेसआर्टिस्ट अशा सगळ्यांची एक भली मोठी मोठी टीम असते. ही टीम बातम्या, कार्यक्रम ऑन एअर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचंड मेहनत करत असते. या सा-यांच्या मेहनतीची फळं म्हणजे ' ग्रेट भेट ', ' टेक ऑफ ', 'रिपोर्ताज ', ' युथ ट्युब ', ' पहिला गजर ', ' सकाळच्या बातम्या ', ' सलाम महाराष्ट्र ', ' दुपारच्या बातम्या ' , ' टॉक टाइम ', ' टी टाइम ', ' संध्याकाळच्या बातम्या ', ' महाराष्ट्र नामा ', 'स्पॉट लाईट ', ' मेगा बातमी ' , ' स्पोर्ट टाइम ', ' प्राइम टाइम ', 'आजचा सवाल ', शो टाइम, ' मेट्रो मीटर, ' ' रात्रीच्या बातम्या ' हे आणि असे अनेक कार्यक्रम. यांच्या कामाची पद्धत आणि वेग भल्याभल्यांना गार करतो. या सगळ्या कलाकारांची, त्यांच्या कामाची आणि कष्टाची ओळख रिपोर्टर प्रियांका देसाईने ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये करून दिली. ती तुम्हाला व्हिडिओवर पाहता येईल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading