S M L
  • यशाची ' ट्रिपल जम्प ' - श्रद्धा घुले (भाग-1)

    Published On: Nov 20, 2008 06:59 AM IST | Updated On: Nov 20, 2008 06:59 AM IST

    ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये अ‍ॅथलीट श्रद्धा घुले आली होती. श्रद्धानं नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल युवा स्पर्धेत ट्रीपल जम्प या प्रकारात सुवर्ण पदक मिळवलं आहे. त्या आधी तिने कोलकाता इथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतेही सुवर्ण पदक मिळवलं आहे. जमशेदपूर आणि पुणे इथे झालेल्या ट्रायल्स स्पर्धेतही श्रद्धाने सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये तिच्या ' गोल्डन ' कामगिरीविषयी जाणून घेण्याची संधी मिळाली. " आयुष्यात तणाव सगळ्यांनाच असतो. तो आपोआप येतो.पण त्या तणावर मात करून यशस्वी होता हे या चिमुरडीने सांगितलं. युवा राष्ट्रकुल स्पर्धेत श्रद्धाने विश्वविक्रम केलेला आहे. युवाराष्ट्रकुल स्पर्धेत तिच्याबरोबर अनेक आघाडीचे खेळाडू होते. तिला थोडं टेन्शन आलं होतं.पण देशासाठी पदक जिंकण्याच्या जिद्दीने ती खेळली. " देशासाठी खेळल्यास सगळ्या गोष्टी साध्य होतात, " असं तिचं म्हणणं आहे. तिचा प्रवास शेजारच्या व्हिडिओवर पाहता येईल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close