S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • राष्ट्रीय कॅन्सर जनजागृती दिवस - कॅन्सर तज्ज्ञ डॉ. मनीष चंद्रा
  • राष्ट्रीय कॅन्सर जनजागृती दिवस - कॅन्सर तज्ज्ञ डॉ. मनीष चंद्रा

    Published On: Nov 7, 2008 07:12 AM IST | Updated On: Nov 7, 2008 07:12 AM IST

    भारतात दरवर्षी सुमारे 5 लाख 50 हजार लोकांना कॅन्सर होतो आणि त्यातल्या 5 लाख 80 हजार लोकांचा मृत्यू हा कॅन्सर या रोगाने होतो. कॅन्सर म्हणजे कर्करोग. जर समाजात कॅन्सरबद्दल जागृकता वाढली तर हे प्रमाण कमी होऊ शकतं हे 'सलाम महाराष्ट्र'मध्ये कॅन्सरतज्ज्ञ डॉ. मनीष चंद्रा यांनी 7 नोव्हेंबरच्या राष्ट्रीय जागृती दिना निमित्ताने संदेश दिला.कॅन्सर म्हणजे काय, तर पेशींची अनियमित वाढ. कॅन्सर हा ह्रदय सोडून शरीराच्या कोणत्याही भागाला होऊ शकतो, असं स्पष्ट झालं आहे. कारण आतापर्यंत कॅन्सर हा ह्दय सोडून शरीराच्या इतर कोणत्याही भागाला झाल्याचं वैद्यकशास्त्र सांगत आहे. भारतात कॅन्सरचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. स्त्रियांना गर्भाशय आणि स्तनांचा कॅन्सर होतो. कमी वयात गर्भधारणा झाल्यामुळे स्त्रियांना गर्भाशयाचा कॅन्सर होतो. गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये यासाठी प्रत्येक स्त्रीने लग्न झाल्यावर कॅन्सरची चाचणी करून घ्यावी. ती अतिशय कमी खर्चाची आहे. स्तनांचा कॅन्सर होऊ नये यासाठी रोज स्त्रियांनी स्तनांची चाचणी करायची. स्तनांचा व्यायाम करायचा. स्तनांच्या कॅन्सरसाठी मॅमोग्राफी नावाची चाचणी केली जाते. तर ती करायची. तरुणांमध्ये मुखाशी निगडीत कॅन्सरचं प्रमाण जास्त आढळतं. जर गुटखा, तंबाखू खाणं सोडलं मुखाशी निगडीत कॅन्सरचं प्रमाण कमी होईल,' असं डॉ. मनीष चंद्रा म्हणाले. सिगरेट आणि दारू पिणा-यांमध्ये ब्लॅडरच्या कर्करोगाचं प्रमाण वाढत आहे. कॅन्सर सोसायटीचा अहवाल असं सांगतो की शहरीकरणामुळे स्तनांच्या कर्करोगाचं (ब्रेस्ट कॅन्सर) प्रमाण वेगानं वाढत आहे. तो नंबर वन झाला आहे. त्याची कारणं अनेक आहेत. जसं की बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी म्हणून, अनुवंशिकता. केमोथेरपी, रेडिओ थेरपीने कॅन्सवर उपाय केला जातो. हेल्दी डाएट आणि नियमिम व्यायाम जर आपण करत राहिलो तर कॅन्सरचं प्रमाण होणार कमी होईल, असंही डॉ. चंद्रा म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close