S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • उगम 'गिरणगाव महोत्सवा'चा - दत्ता इस्वलकर, अनिता पाटील
  • उगम 'गिरणगाव महोत्सवा'चा - दत्ता इस्वलकर, अनिता पाटील

    आईबीएन लोकमत | Published On: Nov 2, 2008 01:21 PM IST | Updated On: Nov 2, 2008 01:21 PM IST

    ''अ‍ॅक्च्युअली 'गिरणगाव महोत्सव' हा 'पुकार'च्या 'मायथॉलॉजी द मुंबई'या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. या 'गिरणगाव महोत्सवा'च्या माध्यामातून लोकांच्या जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा. या लोकांनी गिरणगावाला सांस्कृतिकदृष्ट्या किती थोर बनवलं आहे याची जाणीव करून द्यायची. गिणगावातला 'आजचा युथ' त्याने कदाचित हे पाहिलं नसेल त्यालाही एकदातरी इंटिग्रेटेडली गिरणगावचा श्रीमंत सांस्कृतिक ठेवा पाहण्याची संधी द्यावी, हेच दोन 'गिरणगाव महोत्सव'भरवण्यामागचे मुख्य उद्देश आहेत,'' 'पुकार' संस्थेच्या एक्झक्युटीव्ह डायरेक्टर अनिता पाटील सांगत होत्या. 'पुकार'संस्थेतर्फे परळमध्ये 1ते 3 नोव्हेंबर 2008 दरम्यान गिरणगाव महोत्सवाचं आयोजन कण्यात आलं आहे. त्यानिमित्ताने 'पुकर' संस्थेच्या अनिता पाटील आणि गिरणीकामगार संघर्ष समितीचे सर्वेसर्वा दत्ता इस्वलकर यांना 'सलाम महाराष्ट्र'मध्ये आमंत्रित केलं होतं. मुळातच गिरणगाव महोत्सव का भरवला आणि तो भरवण्यामागचा उद्देश सांगताना अनिता ताई उत्स्फुर्तपणे बोलत होत्या. पण त्यांचं सांगून संपलं नव्हतं... '' 'मायथॉलॉजी मुंबई' हा प्रॉजेक्ट ‘पुकार’तर्फे 2007च्या सप्टेंबर महिन्यात सुरू झाला. 'पुकार'च्या 'माथॉलॉजी द मुंबई' या प्रकल्पाला ‘फोर फाउण्डेशन’चं आर्थिक सहकार्य आहे. या प्रॉजेक्टची सुरुवात मजेशीर झाली. आणि ती ऐकण्यासारखी आहे. 'मायथॉलॉजी द मंुबई' हा प्रकल्प सुरू होण्याआधी पुकारच्या युथ फेलोशिपसाठी आमच्याकडे गिरणगावात राहणारे 4-5 तरुण तरुणी गिरणगावार संशोधन करत होते. त्या मुलांमध्ये अजित अभिनेष म्हणून मुलगा आहे त्याच्याकडून आम्ही गिरणवविषयी खूप ऐकायचो. अजित गिरणगावावरचे छान पोवाडे गायचा. त्या चौघांच्या गप्पांवरून एक गोष्ट लक्षात यायची आणि ती अशी की, गिरणगावामध्ये जे बदल होतायत ते या पाचजणांना आवडत नाही आहेत. त्या बदलांच्याविषयी या मुलांच्या मनात जशी उत्सुकता होती त्याच्या दुपट्टीने काळजीने या मुलांना घेरलं होतं. त्या ग्रुपमधले दोघंतिघंजणं हे चाळीत राहणारे होते. त्यांच्या चाळी तुटल्या आहेत. या मुलांनी गिरणी कामगार संघर्ष समितीत काम केलं आहे. त्यामुळे त्या संघर्षाचे ते साक्षीदार आहेत. त्या मुलांकडून ते ऐकताना अस्वस्थ व्हायला व्हायचं. जे घडतं आहे ते खूप काही चांगलं, भव्य, चांगलं आणि सुंदर आहे, अशी भावना या मुलांमध्ये कुठेच जाणवली इआहे. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की काय घडामोडी घडत आहेत आणि लोकांचं त्याच्याविषयीचं नेमकं मत काय आहे याचा आपण काहीतरी शोध घ्यायला हवा. एकदिवस अजित उद्विग्नतेने मला म्हणालाही की, अनिता मी गिरणगावातलं सगळं फार जवळून पाहिलं आहे. पोवाडे, लावण्या पाहिल्याआहेत. माझी मुलं मात्र हे पाहू शकणार नाहीत. त्याच्या मनातली कळकळ मला सतत दिसून यायची. असं काहीतरी केलं पाहिजे की ज्यातून गिरणगाव संस्कृतीचं जतन केलं जाईल. 'मायथॉलॉजी द मुंबई' या प्रॉजेक्टचा जन्म झाला. आणि या प्रॉजेक्टचा भाग म्हणून 'गिरणगाव महोत्सव' भरवलाआहे. या महोत्सवाचं डॉक्युमेण्टेशन व्हावं ही इच्छा आहे. त्यासाठी आम्ही दत्ता इस्वलकर यांच्यासारख्या दिग्गजांच्या गिरणगावासंदर्भातल्या आठवणीच्या मुलाखती घेणार आहोत. ज्याने आमच्या प्रॉजेक्टला वेटेज तर मिळणार आहे. पण त्याच बरोबरीने गिरणगाव ज्यांना संपूर्ण जाणून घ्यायचं आहे त्यांना तर हे सगळं काही उपयोगी पडणार आहे.'' त्यावेळी 'खरं गिरणगाव कसं होतं,' हे गिरणीकामगार नेते दत्ता इस्वलकरांकडून ऐकायला मिळालं. दत्ता इस्वलकर सांगतात, ''गिरणगावामध्ये आलेला प्रत्येक कामगार हा गावाकडून आला होता. तो प्रत्येक जातीधर्माचा होता. या कामगाराने गिरणगावात येताना त्याने आपल्यासोबत त्यात्या प्रदेशातली संस्कृती आपल्याबरोबर आणली. आणि ती त्याने गुण्यागोविदांनी वाढवली. कामगार हा एकमेव धर्म होता. कोणी कोणाचा कधीच कसल्याप्रकारे द्वेष केला नाही. कोणी ठरवून कलाकार झाला नाही. तर त्याच्या अंगभूत कलागुणांना आपसुकच खतपाणी मिळालं. तुम्हाला ते 'काठी नि घोंगडं घेऊ द्या की रे मला बी जत्रेला येऊ द्या की, या गाण्याचे जनक निवृत्ती पवार हे गाडीवरून घरोघरी जाऊन मीठ विकायचे. आपण कलाकार असून मीठ का आणि कसं विकायचं ही भावना त्यांच्या मनाला कधीच शिवली नाही. इतकी गिरणगावातील माणसं साधी होती.' यांसारख्या भरपूर आठवणी इस्वलकरांनी 'सलाम महाराष्ट्र'मध्ये सांगितल्या. त्याचबरोबर गिरणगावच्या संस्कृतीचं जतन करण्यासाठी काय काय आणि कशी पावलं उचलली पाहिजेत हेही इस्वलकर आणि अनिता पाटील यांनी सांगितलं. ते तुम्हाला वरच्या व्हिडिओवर पाहता येईल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close