• होम
  • व्हिडिओ
  • शालेय पाठ्यपुस्तकांचं ओझं कमी करण्याची गरज आहे का ? (भाग - 3 )
  • शालेय पाठ्यपुस्तकांचं ओझं कमी करण्याची गरज आहे का ? (भाग - 3 )

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Feb 17, 2009 08:23 PM IST | Updated On: Feb 17, 2009 08:23 PM IST

    17 फेब्रुवारीच्या आजचा सवाल ' चा प्रश्न होता - शालेय पाठ्यपुस्तकांचं ओझं कमी करण्याची गरज आहे का ? कारण या दिवशीच्या सर्व महत्त्वाच्या वृत्तपत्रांमधून पाठ्यपुस्तकांना सुट्टी अशी बातमी प्रसिद्ध झाली होती. " 5 ते 6 वर्षाच्या मुलांना न झेपणारं पाठ्यपुस्तकांचं ओझं असणार नाही. तसंच पहिली आणि दुसरीच्या वर्गातल्या मुलांना पाठ्यपुस्तकं असू नये तसा जी.आर. काठला जाणार आहे," असंही त्या बातम्यांमध्ये म्हटलं होतं. सरकारचा हा निर्णय किती योग्य आहे , तो स्वागतार्ह आहे का, असा खरा ' आजचा सवाल 'चा रोख होता. पण आजचा सवालमध्येे फक्त या प्रश्नांपुरती चर्चा केली नाही तर संपूर्ण बाल शिक्षणावर चर्चा केली गेली. मुलांची पुस्तकं, मुलांच्या मुलाखती, मुलांना मिळणारं शिक्षण हे योग्य आहे का तसंच बालशिक्षणाची पद्धती, दर्जा यांवरही चर्चा करण्यात आली. आजच्या सवाल ' च्या बालशिक्षणावर आधारित असलेल्या चर्चेत पालक सुजाता भंडारी, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अनिल पाटील, शिक्षणतज्ज्ञ रजनी दाते, शिक्षण संचालक एम्. आर. कदम या नामवंत पाहुण्यांचा समावेश होता. शालेय पाठ्यपुस्तकांचं ओझं कमी करण्याची गरज आहे, पण मुलांची अभ्यासक्रमाला लावलेली पुस्तकं कमी करू नये, असं मत पालक सुजाता भंडारी यांनी मांडलं. चर्चेत शिक्षण संचालक एम. आर. कदम यांनी आधी शासनाचा अध्यादेश नीट वाचून दाखवला. इयत्ता पहिली आणि दुसरीत शिकणा-या मुलांचं पाठ्यपुस्तकांचं ओझं शासन कमी करणार आहे. म्हणजे त्यांची अभ्यासक्रमाला लावलेली पुस्तक कमी केली जाणारेयत, असं नाही. हा अध्यादेश वाचून दाखवजाताना शिक्षण संचालक एम. आर. कदम म्हणाले, "आम्ही मुलांची पाठ्यपुस्तकं कमी करणार नाहीत. तर मुलांना शाळेत कमीत कमी वह्या पुस्तकं कशी घेऊन जाता येतील, यावर विचार केला जाणार आहे. " "मुलांना ने मकं ओझं कशाचं आहे शारीरिक आहे की बौद्धिक आहे, याचा आधी विचार केला जाते. मुलांना त्रास न होता ते अधिकाधिक कसे शिकतील याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे, " असं मत रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी व्यक्त केलं. " मुलांची पाठ्यपुस्तकं कमी न करता ते वह्या -पुस्तक शाळेत ठेवली पाहिजे. त्यांचा जास्तीत जास्त अभ्यासही शाळेत करून दिला घेतला पाहिजे, " असं शिक्षणतज्ज्ञ रजनी दाते म्हणाल्या. शालेय पाठ्यपुस्तकांचं ओझं कमी करण्याची गरज आहे का ? या प्रश्नावर 78 टक्के लोकांनी ' होय ' असा कौल दिला. चर्चेचा शेवट करताना निखिल वागळे म्हणाले, " समाज बदलत आहे. समाजाची दृष्टी अधिक व्यापक होत आहे. ते पाहता सरकारही बदलू लागलं आहे. पण सरकारनं शिक्षणात मात्र कोणताही बदल करू नये. तो केला तर पत्रकार म्हणून सरकारवर आमचं लक्ष असणार आहे. समाजात जिथे शिक्षण नाही, तिथे समाजाचा विकास नाही. आजची छोटी मुलं हेच उद्याचे नागरिक आहेत. आम्हाला परीक्षेचे पोपट नको आहेत. तर समृद्धपणे जीवन जगणारी फुलपाखरं हवी आहेत. तर या मुलांना जगू द्या. "

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी