दहशतवादामागे पाकिस्तानच

दहशतवादामागे पाकिस्तानच

6 जानेवारी दिल्लीदिल्लीत दहशतवादाच्या मुद्यावर सर्व राज्यातल्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. त्यावेळी केलेल्या भाषणात दहशतवाद हीच देशासमोरची सगळ्यात मोठी समस्या असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. लष्कर-ए-तोयबानचं मुंबईवर हल्ला केल्याचं पंतप्रधानानी यावेळी स्पष्ट केलं. मुंबईवर समुद्रमार्गाने हल्ला झाला त्यामुळे देशातील सागरी सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करणार असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. भारतात पसरवल्या जाणा-या दहशतवादामागे पाकिस्तानचाच हात असल्याच्या पुनरूच्चार पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी यावेळी केला.दहशतवाद हा पाकिस्तानच्या राजकीय धोरणाचा भाग बनलाय आणि पाकिस्तान हे दहशतवाद्यांचं अभयारण्य असल्याचं ते म्हणाले. मुंबई हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधानांनी इतकं कडक वक्तव्य केलंय. पाकिस्तान बांग्लादेश आणि नेपाळमधून अतिरेक्यांना भारतात पाठवत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.सीमेवरची घुसखोरी अजूनही बंद झालेली नाही तसंच दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांकडं अपुरी व्यवस्था असल्याचं पंतप्रधानांनी कबूल केलं. याच कार्यक्रमात बोलताना केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी वेगवेगळ्या संस्थांमध्ये समन्वय साधण्याची गरज व्यक्त केली. दहशतवादाचा प्रतिबंध आणि त्याला तात्काळ उत्तर या दोन गोष्टींवर त्यांनी भर दिला. देशात निर्माण होणा-या आणखी 4 एनएसजीच्या केंद्रांची निश्चितच मदत होईल, असं ते म्हणाले.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 6, 2009 10:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading