पनवेलमध्ये नवीन वर्षाचं कलात्मक स्वागत

पनवेलमध्ये नवीन वर्षाचं कलात्मक स्वागत

1 जानेवारी , पनवेल विनोद घाटगे31 डिसेंबरची रात्र म्हटली की आपल्या डोळ्यांसमोर चित्र उभं रहातं ते दारुच्या नशेत डिस्कोच्या तालावर थिरकणार्‍या तरुणाईचं. नव्या वर्षाचं स्वागत कॉकटेल पार्टीनंच करायचं ही सध्याची फॅशनच बनली आहे. पण या सगळ्यांना छेद दिला आहे तो पनवेलजवळच्या द्वारकाधिश ट्रस्टनं. नव्या वर्षाचं स्वागत् द्वारकाधिश ट्रस्टनं अभिनव पध्दतीनं केलं आहे. द्वारकाधिश ट्रस्टतर्फे प्रत्येक वर्षी नव वर्ष स्वागत सोहळा भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात आयोजीत केला जातो. एकीकडे दारु आणि डॉल्बीच्या तालावर धिंगाणा पार्टी सुरू असताना इथे मात्र शास्त्रीय संगिताची सुरेल मैफिल रंगते. " सेलीब्रेशनच्या नावाखाली वाईट मार्गाला लागलेल्या तरुणाईला योग्य मार्गावर आणण्यासाठीच गेल्या सात वर्षापासून अनोखं सेलिब्रेशन आम्ही द्वारकाधीश ट्रस्ट तर्फे करतो, " अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त अजित कारखानीस यांनी दिली. मंदिरातल्या मंगलमय वातावरणात तेही 31 डिसेंबरच्या रात्री आपली कला सादर करण्यात अनेक कलाकार धन्यता मानतात. यावेळीही प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना आदिती भागवत आणि शास्त्रिय गायिका सायली तळवलकर यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली आहे. " मंगलमय स्पिरिच्युअल वातावरणात नृत्य सादर करण्याचा आनंद काही वेगळा असतो, " अशी प्रतिक्रिया नृत्यांगना अदिती भागवतनं दिली. सायली तळवलक रांच्या 'शामरंग' या कार्यक्रमानं रसिक मंत्रमुग्ध झाले. तर आदितीच्या नुपुरसंध्या या कथ्थकनृत्याने सर्वांचीच भरपुर दाद मिळवली. संध्याकाळी सात वाजता सुरु झालेली ही संगिताची मैफिल रात्री पावणेबारापर्यंत रंगली त्यानंतर मात्र सगळ्यांनाच चाहुल लागली नव्या वर्षाची. ओम नमो भगवते वासुदेवायच्या अखंड गजरात प्रत्येकजण त्या क्षणाची प्रतिक्षा करु लागला. आणि अखेर ती वेळ आली घंटानाद आणि शंखनिनादात नव्या वर्षाचं आगमन झालं. श्रीकृष्णाच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली आणि त्याच्याच साक्षीनं सर्वांनी केला नुतन वर्षासाठी संकल्प केला.

  • Share this:

First published: January 1, 2009, 8:20 AM IST
Tags:

ताज्या बातम्या