04 एप्रिलमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज नाशिकमधल्या एक हजार कर्णबधिरांना श्रवणयंत्राचं वाटप करण्यात आलं. मनसेच्या वर्धापन दिनी हा संकल्प करण्यात आला होता. मनसे आणि स्टारकी (starkey) यांच्या संयुक्त विद्यमानं नाशिक इथं हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि स्टारकी फाऊंडेशनचे बिल ऑस्टिन उपस्थित होते.