News18 Lokmat
  • आशा भोसलेंचा हृदयनाथ पुरस्कारानं गौरव

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Apr 1, 2013 12:29 PM IST | Updated On: Apr 1, 2013 12:29 PM IST

    01 एप्रिलमुंबई : सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांना ह्रदयनाथ पुरस्कारानं गौरवण्यात आलं. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आशा भोसलेंना पुरस्कार प्रदान केला. आशा भोसलेंनी ही पुरस्काराची रक्कम आपण दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देत असल्याचं या कार्यक्रमात जाहीर केलं. बर्‍याच काळानंतर मंगेशकर कुटुंबीय या सोहळ्याच्या निमित्ताने एका व्यासपीठावर उपस्थित होते. यामुळे या कार्यक्रमाला विशेष रंगत आली होती. आशा भोसले यांनी आपल्या मिश्कील स्वभावानं या कार्यक्रमात आणखी बहार आणली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी