S M L
  • 'राज-अजितदादांचं भांडण पाहून वाईट वाटतं'

    Published On: Mar 1, 2013 12:15 PM IST | Updated On: Mar 1, 2013 12:15 PM IST

    01 मार्चमराठी भाषा दिनाच्या दिवशीच राष्ट्रवादी आणि मनसे यांच्यात राज्यभरात जो राडा झाला. असं भांडण दोघांनी करू नये. दोघेही माझे आवडते आहे. दोघांतही काही करून दाखवण्याची ताकद आहे. अजित पवारांमध्ये काम करून घेण्याची ताकद आहे. राज ठाकरेंमध्ये काम करून दाखवण्याची ताकद आहे. पण असं भांडत असतील तर ते खरंच चुकीचं आहे. बरं ते आता लहान आहे का ? असं नाही करायचं असं सांगायला अशी नाराजी अभिनेता नाना पाटेकर यांनी व्यक्त केली. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी घेतलेल्या ग्रेट भेट या कार्यक्रमात त्यांनी ही नाराजी व्यक्त केली. तसंच विसरू नका एवढीच अपेक्षा आहे. सरतेशेवटी तुम्ही मराठी माणसासाठी आहात. हे विसरू नका. कारण लोकांना आवडला तर तुम्ही राहणार आणि आवडला तर राहणार नाही. हे म्हणजे एका हाताने दुसर्‍या हाताला मारण्यासारखं आहे. असं नका करू. आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो. आमचं प्रेम नगण्य नाही ते झिडकारू नका अशी विनंतीही नाना पाटेकर यांनी केली. तुम्ही दोघंही छान आहात तुमची आम्हाला गरज आहे पण आम्ही लाचार नाही हे लक्षात ठेवा.फक्त या प्रेमाच्या बदल्यापोटी तुम्ही काहीतरी द्या हीच अपेक्षा आहे म्हणून आजपर्यंत आम्ही गप्प आहोत. कधीतरी आम्हालाही गोंजारा, आमच्यासाठी काही तरी करा अशी भावनिक मागणीही नानांनी केली. ही मागणीकरत असताना नाना भारावून गेले होते. नाना पाटेकर यांचीही विशेष ग्रेट भेट तुम्ही पाहू शकतात उद्या शनिवारी रात्री 9.30 वाजता फक्त आयबीएन लोकमतवर

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close