News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • स्त्री-पुरूष मुक्ती होण्यासाठी परस्पर संवाद गरजेचा -निखिल वागळे
  • स्त्री-पुरूष मुक्ती होण्यासाठी परस्पर संवाद गरजेचा -निखिल वागळे

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Feb 18, 2013 07:52 AM IST | Updated On: Feb 18, 2013 07:52 AM IST

    10 फेब्रुवारी'मिळून सार्‍याजणी' मासिकातर्फे आयोजित 'मला उमगलेला पुरूष आणि कुटुंबातील पुरूष' या विषयांवर आयोजित कार्यक्रमात नाटककार शफाअत खान, लेखिका मेघना पेठे आणि आयबीएन लोकमतचे संपादक निखील वागळे यांच्या विचार करायला लावणार्‍या भाषणांमुळे कार्यक्रम चांगलाच रंगला. पुण्यात आयोजित कार्यक्रमात नाटककार शफाअत खान यांनी वेगवेगळी उदाहरणे - किस्से सांगत कुटुंबातील पुरूष आज कसा आहे हे उलगडून दाखवलं तर मेघना पेठे यांनी स्त्रिया बदलताय पण आजचा पुरूष हा असुरक्षित आहे तो बदलायला तयार नाहीय हे ठासून सांगितलं. तर आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी स्त्री आणि पुरूष हे एकमेकांचे शत्रू नाहीत. दोघांनीही परस्परांशी संवाद साधला तरच स्त्री उमजेल. पुरूषही उमजेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणूस उमजेल असं अध्यक्षीय समारोपाच्या भाषणात मत मांडलं. या कार्यक्रमाला मिळून सार्‍याजणी मासिकाच्या संपादक विद्या बाळ , गीताली वि.मं तसंच रसिक आणि दर्दी पुणेकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी