S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • जनतेच्या पैशांवर नेत्यांच्या शाही लग्नाचा थाट -निखिल वागळे
  • जनतेच्या पैशांवर नेत्यांच्या शाही लग्नाचा थाट -निखिल वागळे

    आईबीएन लोकमत | Published On: Feb 18, 2013 01:19 PM IST | Updated On: Feb 18, 2013 01:19 PM IST

    18 फेब्रुवारीमहाराष्ट्राच्या राजकारणाचं वाढतं गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी पत्रकारांबरोबरच सामाजिक कार्यकर्त्यांनीही पुढाकार घेतला पाहिजे असं मत आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी व्यक्त केलं. चिपळूणच्या राष्ट्र सेवा दलाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात निखिल वागळे यांची राजन ईंदूलकर यांनी प्रकट मुलाखत घेतली. यावेळी वागळे यांनी या मुलाखतीत आपले सडेतोड विचार मांडले. नेत्यांच्या घरचे शाही लग्नसोहळे हे जनतेच्या पैशांवर होत असल्याची परखड टीका यावेळी निखिल वागळे यांनी केली. तसंच साहित्य संमेलनात थोर साहित्यिक हमीद दलवाई यांच्या घरून काढण्यात येणार्‍या दिंडीवरून वाद निर्माण झाला होता. पण लोकशाहीत सर्वांना आपलं मत मांडण्याचा अधिकार असल्याचं यावेळी निखिल वागळे यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close