• ग्रेट भेट : बैजू पाटील

    Sachin Salve | Published On: Feb 4, 2013 03:34 PM IST | Updated On: May 13, 2013 02:43 PM IST

    'फॅन थ्रोटेड लिझार्ड'जातीचा सरपटणार सरडा एका मादीला आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करतो...त्याचा हा प्रयत्न पाहून दुसरा एक सरडा त्याच्यावर हल्ला करतो...निसर्गाच्या रम्य वातावरणात दोन प्राण्यांची जीवाच्या आंकाताने सुरू झालेली झुंज कॅमेर्‍यात टिपली गेली...आणि हे छायचित्र जगभरातील 70 हजार छायाचित्रात देखणे ठरले... या छायाचित्रामुळे मराठवाड्यातला एक छायाचित्रकार प्रकाशझोतात आला..आणि हे छायाचित्र टिपले होते छायचित्रकार बैजू पाटील यांनी... बैजू पाटील यांनी आजपर्यंत अनेक वन्य प्राण्यांना आपल्या कॅमेर्‍यात कैद केलं. त्यांच्या या छायाचित्राची दखल राष्ट्रीय,आंतराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. अलीकडेच त्यांना प्रतिष्ठेचा 'सेंच्युरी' पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. याअगोदरही त्यांना वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी महाराष्ट्रातला सर्वोच्च असा 'वाईल्ड महाराष्ट्र' पुरस्कार मिळाला आहे.त्यांच्या हा प्रवास 'ग्रेट भेट' कार्यक्रमात 'कैद' करण्याचा हा प्रयत्न...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close