S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • निखिल वागळे यांना डॉ.चिंतामणराव देशमुख स्मृती पुरस्कार प्रदान
  • निखिल वागळे यांना डॉ.चिंतामणराव देशमुख स्मृती पुरस्कार प्रदान

    Published On: Jan 14, 2013 02:58 PM IST | Updated On: Jan 14, 2013 02:58 PM IST

    14 जानेवारीरोहा तालुका पत्रकार संघातर्फे देण्यात येणार्‍या डॉ. चिंतामणराव देशमुख स्मृती पुरस्कारानं आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांना गौरवण्यात आलं. डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. हिंमतराव बावस्कर यांच्या हस्ते हा राज्यस्तरीय पुरस्कार निखिल वागळे यांना प्रदान करण्यात आला.'महाराष्ट्र हा आज कृतघ्न आहे याचं कारण असं की, चिंतामणराव देशमुख यांच्यासारख्या असामान्य व्यक्तिमत्त्वाला आपण पूर्ण विसरून गेलोय. राजीव गांधी, इंदिरा गांधी यांच्या जयंती, पुण्यतिथीला अर्ध्या पानाच्या जाहिराती भरून येतात. पण आज चिंतामणराव देशमुख यांची 114 वी जयंती आहे याबद्दल त्यांच्या स्मरणाची महाराष्ट्र सरकारला एक साधी जाहिरात द्यावीशी वाटत नाही ? मुळात हा सरकारचा करंटेपणा आहे. चिंतामणराव देशमुख हे रिझर्व्ह बँकेचे पहिले मराठीच नव्हे तर भारतीय गव्हर्नर होते हे लक्षात घ्यावं. ते देशाचे पहिले अर्थमंत्री होते आणि ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र व्हावा, मुंबई महाराष्ट्रात राहावी यासाठी राजीनामा फेकून दिला होता' असं परखड मत निखिल वागळे यांनी व्यक्त केलं. तसंच चिंतामणराव यांचं रोह्याच्या परिसरामध्ये स्मारक व्हावं अशी मागणीही वागळे यांनी केली. त्याचबरोबर त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराचा जाहीर निषेध केला. 'पत्रकारितेच्या नावावर पैसे मागणार्‍या पत्रकारांना जेलमध्ये टाकावे. 'पेड न्यूज' नावाचा जो प्रकार हल्ली वाढला आहे आणि जो पत्रकार 'पेड न्यूज' घेतो तो पत्रकारितेच्या आत्म्याशी प्रतारणा करतो' असं मतही वागळे व्यक्त केलं. चिंतामणराव देशमुख यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार आज मला देण्यात आला त्याबद्दल मी कृतघ्न आहे, मी जी काही पत्रकारिता केली त्याचा हा सन्मान आहे अशा शब्दात निखिल वागळे यांनी आयोजकांचे आभार मानले. या कार्यक्रमात लोकसत्ताचे पत्रकार श्रीराम पुरोहित यांना राजाभाऊ देसाई शोध पत्रकारिता पुरस्कार आणि इंडियन एक्स्प्रेसचे प्रशांत नाडकर यांना जनार्दन शेडगे उत्कृष्ट फोटोग्राफी पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close