S M L
  • बाळासाहेब ठाकरे मेळाव्याला हजर राहतील का ?

    Published On: Oct 24, 2012 11:51 AM IST | Updated On: Oct 24, 2012 11:51 AM IST

    विनोद तळेकर, मुंबई24 ऑक्टोबरशिवसेनेचा दसरा मेळावा आज शिवाजी पार्कवर पार पडतोय. या मेळाव्याच्या निमित्तानं गर्दीची चर्चा होईल..बाळासाहेब येणार का ? याचे तर्क लढवले जातील, घोषणाबाजीला ऊत येईल...पण शिवसेनेसमोरच्या आव्हानाची चर्चा कदाचित होणार नाही...शिवसेनेच्या सेहेचाळीसाव्या वर्षात नेमकी काय आव्हानं उद्धव ठाकरे यांच्या समोर आहेत त्याबाबतचा हा रिपोर्ट...एक नेता, एक मैदान आणि एक विचार....दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडतोय. या मेळाव्याचं प्रमुख आकर्षण असणार आहे अर्थातच बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण...त्याचबरोबर यावेळी अजून एक आकर्षण असणारेय ते म्हणजे बाळासाहेबांच्या निवडक व्यंगचित्राच्या पुस्तकाचं प्रकाशन...पण यंदाचा दसरा मेळावा हा थोड्या वेगळ्या राजकीय वातावरणात होतोय. कधी नव्हे इतकी आव्हानं सध्या उद्धव ठाकरे यांच्यासमोर असणार आहेत. काही महिन्यांपूर्वीच्या आजारपणातून आता उद्धव ठाकरे सावरलेत. पण अजूनही त्यांनी हवं तसं लक्ष संघटनेत घातलेलं नाही. त्यामुळेच नाशिकमधली बबन घोलप यांची नाराजी असेल किंवा कोकणात परशुराम उपरकर यांची अस्वस्थता यावर योग्य तो निर्णय अजून नेतृत्वाला घेता आला नाही. दुसरीकडे सामान्य शिवसैनिकासमोर कोणताही कार्यक्रम नसल्यामुळे शिवसेनेचं राज्यात अस्तित्वच जाणवत नाही. शिवसेना फटकून वागत असल्यानं आरपीआयही नाराज आहे. तसंच इतर पक्षातून आलेल्यांनाही अडगळीत टाकल्यामुळे त्यांची होत असलेली घुसमट...या आणि अशा अनेक बाबींवर उद्धव ठाकरेंना सक्रीय व्हावं लागेल.दसरा मेळाव्याला शिवसैनिकांच्या आयुष्यात एक अनन्य साधारण महत्व आहे. याच मेळाव्याच्या माध्यमातून बाळासाहेब शिवसैनिकांना एखादा कार्यक्रम देऊन वर्षभराच्या कामाची रुपरेषा आखत..तोच कित्ता गिरवत यावर्षीच्या मेळाव्यात शिवसेनेसमोरच्या प्रश्नांची उत्तरं उद्धव ठाकरे देणार का हे पाहावं लागणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close