S M L
  • डांगी जनावरं धोक्यात

    Published On: Aug 17, 2012 02:36 PM IST | Updated On: Aug 17, 2012 02:36 PM IST

    दीप्ती राऊत, नाशिक17 ऑगस्टआज पोळा...शेतकर्‍याच्या सर्जाराजाचा सण. एकीकडं मोठ्या जल्लोषात पोळा साजरा होतोय. तर दुसरीकडे अनेक देशी जनावरांच्या जाती धोक्यात आल्यात. त्यापैकीच एक म्हणजे डांगी. सह्याद्रीच्या रांगांनी वेढलेला डोंगदर्‍यांचा हा डांग पट्टा आणि त्याच्या कडेकपारीत चरणारी ही डांगी जनावरं. गेल्या काही वर्षात डांगी जनावरांचं प्रमाण झपाट्यानं कमी होतंय. त्यामुळं इथल्या शेतकर्‍यांना नांगराला रेडे जुंपावे लागत आहेत.पहिली आमच्या घरात 20-25 गाई होत्या. आता सगळ्या मरून गेल्या. आज दोन रेडे पाळलेत. कशीबशी शेती करतो अशी व्यथा शेतकरी मंगळ्या अस्वले यांनी मांडली. कुमशेतच्या मंगळ्याभाऊंकडे आता तीनच डांगी गाई उरल्यात. इतरांचीही तीच अवस्था..चिवट खूर आणि तेलकट त्वचा यामुळे इथल्या मुसळधार पावसातल्या चिखलातल्या शेतीसाठी डांगीच लागते.डवळा मुढे म्हणतात, आम्हाला डांगीशिवाय पर्याय नाही. आम्ही औताला रेडे धरतो, पण त्यांचे खूर पावसाळ्यात नरम होतात.एकट्या कुमशेतमध्ये 10 वर्षांपूर्वी सतराशे डांगी जनावरं होती. आज ती संख्या आठशेवर आली आहे. संगमनेरच्या लोकपंचायत संस्थेच्या वतीने सहभागी पद्धतीने डांगी संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत. सयाजींसारख्या स्थानिक तरुणांना त्यासाठी प्रशिक्षण दिलं गेलंय.सयाजी अस्वले म्हणतात, आमच्याकडे 2 हजार सालापर्यंत भरपूर गाया होत्या. 2 हजारमध्ये अतिवृष्टी झाली आणि त्यानंतर डांगी कमी होत गेल्या. आम्ही पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना निवेदनं देतो, लसीकरण करतो. गेल्या 10 वर्षात या गावात पोळा साजरा करण्यात आलेला नाही. डांगीसारख्या देशी जनावरांच्या जाती टिकल्या पाहिजेत, वाढल्या पाहिजेत. त्यालाच खरं तर पशुसंवर्धन म्हणता येईल. पण आपल्या पशुसंवर्धन खात्याला या याची कळकळ ना कोणत्या कार्यक्रम. नाशिक-नगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवरच्या 15 गावांमध्ये लोकपंचायतनं डांगी संवर्धनाचं काम सुरू केलंय.पश्चिम घाटाच्या संवर्धनात डांगींचं जतन खूप महत्त्वाचं आहे. आज साथीचे आजार आणि कुपोषण यामुळे डांगी जनावरं कमी होत आहेत. डांगी वाचली तर आम्ही वाचू अशी भावना सामाजिक कार्यकर्ते विजय सांबारे व्यक्त केली.लोकपंचायतच्या या प्रयत्नांमुळे डांगी वाचत आहेत. त्यांना गरज आहे ती पशुसंवर्धन खातं आणि जैवविविधता बोर्डाच्या सक्रीय पाठबळाची. तेव्हाच या भागात खर्‍या अर्थानं पोळा साजरा होईल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close