S M L
  • राज्यभरात विठ्ठल भक्तांची मांदियाळी

    Published On: Jun 30, 2012 12:28 PM IST | Updated On: Jun 30, 2012 12:28 PM IST

    30 जूनभेटी लागी जीवा, लागलीस आस... आज आषाढी एकादशी निमित्त राज्यात ठिकठिकाणच्या विठ्ठल मंदिरात आज भक्तांनी गर्दी केली. प्रतीपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबईतील वडाळ्यात आज पहाटेपासूनच विठ्ठल भक्तांनी मोठी गर्दी केली. विठू नामाचा गजर करत विठ्ठलाचं दर्शन घेतलं जातंय. विठ्ठल दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्यात. तसेच डोंबिवलीतील दत्तनगर परिसर विठुनामाच्या गजरानं दुमदुमला. परिसरातील विठ्ठल रुख्मीनी मंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी एकच गर्दी केली. तर विदर्भात वर्ध्यातील प्राचीन विठ्ठल मंदिरातही आज भाविकांनी पहाटेपासूनचं दर्शनासाठी गर्दी केली होती. प्राचीन हेमाडपंथी रचना असलेलं हे मंदिर प्रति पंढरपूर या नावानेही प्रसिध्द आहे.आषाढी एकादशी निमित्तानेआज पुजा अर्चा आणि भक्तीमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. तर मराठवाड्याच्या राजधानी औरंगाबादमध्ये वाळूज पंढरपूर एमआयडीसी परिसरातील विठ्ठल मंदिरात भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी गर्दी केली. काल दिवसभर या मंदिरात आषाढी एकादशीची तयारी सुरु होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close