S M L
  • 'अग्नी -5' ची चाचणी यशस्वी

    Published On: Apr 19, 2012 10:18 AM IST | Updated On: Apr 19, 2012 10:18 AM IST

    19 एप्रिलअग्नि-5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी हा भारताच्या संरक्षण सिद्धतेचा पुरावा आहे. या क्षेपणास्त्राची आंतरखंडीय मारा करण्याची क्षमता आहे. आणि यामुळे असं प्रभावी क्षेपणास्त्र असणारा, भारत हा जगातला पाचवा देश बनला. 3.. 2.. 1.. अग्नी-5 गर्जना करत नारंगी आणि पांढर्‍या रंगाचा धूर उडवत 5 हजार किलोमीटरच्या प्रवासावर निघालं. जसजसं हे क्षेपणास्त्र आकाशात उंच उंच भरारी घेत होतं, तसतशी कंट्रोल रुममध्ये शास्त्रज्ञांच्या चेहर्‍यावरची चमक वाढत होती. टीव्हीच्या पडद्यावर अग्नि-5 फक्त धूर सोडताना दिसत होतं. बघता बघता अग्नी -5 ते अंतराळात पोचलं. पुन्हा तेवढ्याच गतीने ते पृथ्वीच्या वातावरणात दाखल झालं. आणि 5 हजार किलोमीटरवर असलेल्या आपल्या लक्ष्याला अचूक भेदत आपली क्षमता सिद्ध केली.. या सर्व प्रक्रियेला वेळ लागला फक्त 17 मिनिटं...म्हणजेच 17 मिनिटात शत्रूचा. या यशस्वी चाचणीनं भारताची संरक्षण क्षमता अभेद्य झाली.अग्नि 5च्या यशस्वी चाचणीनंतर शास्त्रज्ञांवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अग्नी 5 मुळे आयसीबीएम (ICBM) म्हणजेच इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाईल सज्ज देशांच्या मोजक्या यादीत भारताचाही नंबर लागला. भारताव्यतिरिक्त अमेरिका, रशिया, फ्रांस आणि चीनकडे असं क्षेपणास्त्र आहे.5 हजार किलोमीटवर असलेलं लक्ष्य भेदण्याची या क्षेपणास्त्रीच क्षमता आहे. संपूर्ण चीन आणि युरोपच्या काही भागांवर या क्षेपणास्त्राने हल्ला करता येऊ शकतो. यावर एकाच वेळी 3 अण्वस्त्रं ठेवलं जाऊ शकतात, त्यामुळे एकाच वेळी तीन लक्ष्यांना उद्धवस्त करता येतं. 17 मीटर उंच आणि 2 मीटर रुंद अग्नी-5चं वजन 50 टन आहे. एक क्षेपणास्त्र 1 टन वजनाची अण्वस्त्रं वाहू शकतो. या क्षेपणास्त्रामागे 2 हजार शास्त्रज्ञांची अहोरात्रची मेहनत आहे. आणखी काही चाचण्यांनंतर अग्नी-5 भारतीय सैन्यात दाखल होईल आणि याचबरोबर अग्नी या भारताच्या गौरवशाली क्षेपणास्त्र परंपरेत आणखी एका क्षेपणास्त्राची भर पडेल. 700 किमी मारा करणारं अग्नी-1, 2 हजार किमीपर्यंत मारा करणारं अग्नी-2, अडीच हजार किमीपर्यंत मारा करणारं अग्नी-3 आणि साडे तीन हजार किमी मारा करणारं अग्नी चार क्षेपणास्त्र भारतीय लष्करात आहेत. यात आता अग्नी-5चाही समावेश झाला आहे. यामुळे दहा हजार किलोमीटरवर असलेल्या शत्रूचा भेद घेणारं क्षेपणास्त्र तयार करण्याचं भारताचं स्वप्नही लवकरच पूर्ण होईल, यात शंका नाही.अग्नी 5 हे क्षेपणास्त्र लवकरच भारतीय सैन्याच्या ताफ्यातही दाखल होईल. पण आपल्या शेजारच्या देशांकडे कुठली क्षेपणास्त्र आहेत, ती किती घातक आहेत, त्यांची क्षमता काय आहे.आणि त्याला उत्तर देण्यासाठी भारताकडे कुठली क्षेपणास्त्र आहेत त्यावरही एक नजर टाकूया...पाकिस्तानची क्षेपणास्त्र सिद्धता - पाकिस्तानकडे सध्या 3 क्षेपणास्त्र आहेत- गझनवी क्षेपणास्त्र290 किमी मारा करण्याची क्षमता- शाहीन-1 क्षेपणास्त्र500 किमी मारा करण्याची क्षमता- घौरी क्षेपणास्त्र1500 किमी मारा करण्याची क्षमता- क्रुझ क्षेपणास्त्र : बाबर600 किमी मारा करण्याची क्षमताचीनची क्षेपणास्त्र सिद्धता - डीएफ (DF)- 31 क्षेपणास्त्र8000 किमी मारा करण्याची क्षमतासध्या 15 क्षेपणास्त्र वापरातकाही तिबेटमध्ये तैनात- अत्याधुनिक DF-31 क्षेपणास्त्र11,000 किमी मारा करण्याची क्षमता- जेआय(JI) -2 पाणबुडी क्षेपणास्त्र 8,000 किमी मारा करण्याची क्षमताहिंद महासागरातही JI-2 तैनातअग्नी-5 च्या चाचणीवर इतर देशांच्या काय प्रतिक्रिया अमेरिका'भारताचा अण्वस्त्र प्रसारबंदी रेकॉर्ड खूप चांगला आहे.'चीन सरकार 'चीन आणि भारत उगवत्या महासत्ता आहेत. आम्ही प्रतिस्पर्धी नाही, सहकारी आहोत.'चीनच्या सत्ताधारी पक्षाचं पिपल्स डेली वर्तमानपत्र'भारत आण्विक आणि मिसाईल नियंत्रण कराराचा भंग करत असूनही त्याकडे पाश्चिमात्य देश दुर्लक्ष करतायत. भारताने आपल्या ताकदीची अतिशयोक्ती करू नये.'या यशामागे 'अग्निपुत्री' !अग्नी-5च्या यशानंतर शास्त्रज्ञांवर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होतोय. पण या यशामागे हात आहे तो एका महिलेचा. टेसी थॉमस असं त्यांचं नाव आहे. टेसी थॉमस या अग्नी-5च्या प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत. टेसी थॉमस या इंजीनिअरिंगच्या पदवीधर आहेत. त्यानंतर त्यांनी पुण्यातल्या डिफेंस इंस्टिट्यूट ऑफ ऍडव्हांस टेक्नॉलॉजीमधून एम टेक केलं. त्या शास्त्रज्ञ म्हणून डीआरडीओ (DRDO) मध्ये रुजू झाल्या. आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक समजले जाणारे ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी टेसी थॉमस यांना अग्नी क्षेपणास्त्राच्या संशोधन कार्यक्रमाशी जोडलं. अग्नि-2, अग्नि-3 आणि अग्नि-5 च्या टीममध्येही त्या होत्या. त्यानंतर अग्नि-5 च्या टीमचं नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली. 1988 मध्ये त्या या प्रोजेक्टमध्ये सहभागी झाल्या आणि तेव्हापासून त्यांना अग्निपुत्रीही म्हटलं जातं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close