• बिहार दिनाला राज ठाकरेंचा विरोध मावळला

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Apr 13, 2012 01:58 PM IST | Updated On: Apr 13, 2012 01:58 PM IST

    13 एप्रिलनितीशकुमार एक चांगले मुख्यमंत्री आहे त्यांचा काही गैरसमज झाल्यामुळे त्यांनी मीडियाला व्हिसा वगैरेचे विधान केले. त्यामुळे मला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे लागले. पण आज नितीश कुमार यांच्याशी फोन वर चर्चा झाली. त्यांनी यामागे कोणतेही राजकारण करायचे नाही फक्त हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे असं स्पष्ट केलं. त्यामुळे माझा बिहार दिनाला हरकत नाही असं राज ठाकरे यांनी जाहीर केलं. पण सांस्कृतिक कार्यक्रमातून राजकीय खेळी खेळली जात असेल तर त्याला आपला विरोध आहे आणि ऐनेवेळी काही असलं झालं तर मनसे आपल्या स्टाईलने उत्तर देईल असा इशारा ही राज यांनी दिला.बिहार दिनावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुकारलेले 'युध्द' सुरु होण्याआधीच शांत झाले आहे. आज बिहार दिनाचे आयोजक देवेश ठाकूर यांनी राज ठाकरे यांच्या निवास्थानी कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. तब्बल अर्धातास ही चर्चा चालली. या दरम्यान राज ठाकरे यांची नितीश कुमार यांच्याशी फोनवर चर्चा झाली. बैठक आटपून राज यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नितीश कुमार हे एक चांगले मुख्यमंत्री आहे. त्यांना हे कसे सुचले हे मला कळत नाही. पण त्यांनी माध्यमांशी बोलताना मला कोणाच्या व्हिसाची गरज नाही असं विधान केलं. त्यांचं हे विधान माध्यमांसाठी होतं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे काहीतर गैरसमज झाला. पण असल्या विधानामागे काही राजकारण आहे का हे पाहावे लागते. त्यामुळे बिहार दिनाला काल आम्ही विरोध दर्शवला. आणि आतापर्यंत हेच करत आलो यात काही नवीन नाही. पण नितीश कुमार यांच्याशी फोनवर चर्चा झाली तेंव्हा ते म्हणाले की, बिहार दिनाला 100 वर्ष पूर्ण झाली त्यामुळे मुंबईतील बिहारी बांधवांसाठी एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाची सुरवात आम्ही जय महाराष्ट्र गिताने करणार आहे. यामागे कोणतेही राजकारण नाही असं स्पष्ट केलं. जर असं असेल तर आपला कधीच सांस्कृतिक कार्यक्रमाला विरोध नाही. पण देशाला स्वतंत्र्य होऊन 62 वर्ष झाली आहे. बिहारला 100 वर्ष कशी झाली याच गणित त्यांनाच ठाऊक. पण सांस्कृतिक कार्यक्रम होत असेल तर माझा बिहार दिनाला विरोध नाही असं राज यांनी जाहीर केलं. पण मुंबईत येऊन ताकद दाखवायची असेल तर मग आम्ही आमची ताकद दाखवून देऊ अशा राजकीय खेळीला परतवून लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असंही राज यांनी ठणकावून सांगितले. तसेच मी नितीश कुमार यांच्याशी फोनवर चर्चा झाली तेंव्हा त्यांनी तिकडच्या परिस्थितीबद्दल बरेच काही सांगितले. मग बिहारमध्ये इतकी प्रगती होत असेल तर महाराष्ट्रातील लोकांना बिहारमध्ये बोलवा असे राज यांनी नितीश कुमारांना सांगितले. तसेच आपण बिहार दिनाच्या कार्यक्रमाला जाणार का ? असा सवाल पत्रकारांनी विचारला असता. मला बिहारी येत नाही त्यामुळे मी जाणार नाही. आपण आपल्या राज्याचा दिन आपल्याच राज्यात साजरा केला पाहिजे. तर त्याला महत्व आहे याची अंमलबजवाणी सर्वानी केली पाहिजे असंही राज म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी