S M L
  • यापुढे युतीशी 'अग्रीमेंट'- आठवले

    Published On: Mar 21, 2012 06:31 PM IST | Updated On: Mar 21, 2012 06:31 PM IST

    21 मार्चभीमशक्ती एकत्र आल्यामुळे शिवशक्तीला मोठी ताकद मिळाली दलित समाजाने पहिल्यांदा शिवसेना-भाजपला इतक्या मोठ्या प्रमाणात मत दिली त्याबळावर यांची सत्ता आली. पण आम्हाला ऐनवेळी डावलण्यात आलंय. पण यापुढे येणार्‍या निवडणुकांमध्ये युतीशी अग्रीमेंट करून राहणार असही आठवले यांनी स्पष्ट केलं. तसेच दलित जनतेचा विचार केला गेला नाही, यापुढे जर आमच्या मागण्या मान्य केल्या गेल्या नाही तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांनी महायुतीला दिला. भीमशक्ती-शिवशक्ती एकत्र येऊन काही महिने उलटत नाही तोच महायुतीच्या चिरेबंद 'गडा'ला तडे जाऊ लागले. शिवसेनेनं राज्यसभेची उमेदवारी अनिल देसाई यांना देऊन नव्या 'पार्टनर'ची नाराजी ओढावून घेतली. मनोहर जोशी यांची राज्यसभेची जागा आपल्याला मिळेल अशी अपेक्षा रामदास आठवले यांनी मनात बांधली होती. याची कबुली खुद्द आठवले यांनी आयबीएन लोकमतकडे दिली होती. मात्र तसे काही घडले नाही. अनिल देसाई राज्यसभेची उमेदवारी मागे घेतील आणि आठवलेंना देण्यात येईल अशी शक्यता होती पण तसेही काही घडले नाही. आणि आज अखेर रामदास आठवले यांनी आपली नाराजी व्यक्त केली. आयबीएन लोकमतच्या 'प्राइम टाईम बुलेटीन' या कार्यक्रमात रामदास आठवले यांनी महायुतीला थेट इशारा दिला. दलित समाजाने पहिल्यांदा शिवसेना- भाजपला इतक्या मोठ्या प्रमाणात मत दिली त्याबळावर यांची सत्ता आली. पण नितीन गडकरी, बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे आम्हाला का विसरले हे मला कळाले नाही. मी कधी कोणती अट टाकली नाही पण दलित जनतेत जी नाराजी आहे ती दूर करण्यासाठी युतीने राज्यसभेची जागा दिली पाहिजे होती असं स्पष्ट मत आठवलेंनी व्यक्त केलं. तसेच आमच्या शिष्टमंडळाने उध्दव यांची भेटून आमची मागणी सांगितली होती. मी सुध्दा दिल्लीत गोपीनाथ मुंडे यांची भेट घेतली पण दोन्ही पक्षांनी कोणताच निर्णय घेतला नाही. एकमेकांमध्ये टोलवाटोलवी केली असा आरोपही आठवलेंनी केला. त्याबरोबर आजपर्यंतच्या राजकारणात आमची नेहमी फसवणूक झाली. आमचा पक्षा थोड्या लोकांचा आहे त्यामुळे यांच्यासोबत येऊन असा अनुभव पदरी पडला आहे. उध्दव यांनी फारसे विश्वासात घेतले नाही पण यापुढे असे होऊ नये कारण उद्या 2014 च्या निवडणुकीत एकत्र येऊन सत्ता स्थापन करायची असेल एकत्र राहणे गरजेच आहे पण यापुढे सत्तेमध्ये काय मिळणार, विधानसभेत,लोकसभेत किती जागा मिळणार हे सगळं चित्र स्पष्ट झाल्यावर पुढील लढाई लढण्यासाठी सोप जाईल पण भीमशक्तीला डावलण्यात आलं तर काँग्रेसची या पालिका निवडणुकीत जशी अवस्था झाली ती समोरच आहे याचा विचार युतीने करावा जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही, सारखी अवहेलना केली जात असेल तर वेगळा विचार करावा लागेल असा इशाराही आठवले यांनी दिला. पण आता पुढच्या निवडणुका लक्षात घेऊन महायुतीने याचा विचार करावा अशा सल्लाही आठवले यांनी दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close