S M L
  • शोध सावित्रीचा

    Published On: Mar 9, 2012 06:02 PM IST | Updated On: Mar 9, 2012 06:02 PM IST

    08 मार्च8 मार्च 2012 जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होतोय. भूतकाळाच्या पायवाटा चाचपडून पाहताना आज महिला खरंच चार पावलं पुढे चालली आहे का ? हा प्रश्न पडतो. भलेही आज महिलांना 50 टक्के आरक्षण मिळालं पण वास्तवात खरंच महिलांना याचा लाभ होता का ? हा प्रश्न महिलांना विचारला तर नेमक याचं उत्तर अबोलच मिळालं. अलीकडेच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत महिलांसाठी 50 टक्के आरक्षण देण्यात आले. अनेक महिला उमेदवारही राजकारणाच्या रिंगणात उतरल्यात पण आरक्षण म्हणूनच तिच्याकडे पाहिलं गेलं. ज्या सावित्रीबाई फुलेंनी महिलांच्या हातात पेन दिला. त्या सावित्रीच्या लेकीला स्वत:च्या मर्जीने सही करण्याचा अधिकार दिलाय का ? अशा अनेक प्रश्नांचा गुंता सोडवण्यासाठी आयबीएन लोकमतने राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील महिलांच्या भेटी घेतल्या, त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्यातल्या 'सावित्रीचा शोध' घेतला. स्त्री स्वतंत्र आहे का याविषयावर आयबीएन लोकमतने महिला दिनाच्या निमित्तानं एक खास सर्व्हे केला. त्यावरच आमचा हा विशेष कार्यक्रम शोध सावित्रीचा...या कार्यक्रमात महिला राजसत्ता आंदोलनाचे कार्यकर्ते भीम रासकर, टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेसचेअसोसिएट प्रोफेसर डॉ.अमिता भिडे, सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिंवसरा, अभिनेत्री विभावरी देशपांडे यांचा सहभाग होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close