S M L
  • नाशिकमध्ये मनसेचाच महापौर होणार - राज

    Published On: Mar 9, 2012 05:28 PM IST | Updated On: Mar 9, 2012 05:28 PM IST

    09 मार्चपुण्यात विरोधी बाकावर बसलो आता नाशिकमध्ये मनसेचाच महापौर होणार, मी एकीकडून दोर सोडला तर दुसरीकडे घट पकडून ठेवत असतो असं सांगत राज ठाकरे यांनी नाशकाच्या महापौरपदी पुन्हा एकादा दावा केला. तसेच निवडणुकीत व्यवहार झाले. पण माझ्या पक्षाशी केलेले गद्दारी सहन करणार नाही, येणार्‍या काळात त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा राज यांनी बंडखोरांना दिला. मनसेच्या 6 व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमात राज बोलत होते.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेला आज 6 वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बंडखोरांना चांगलाच दम भरला. येत्या एप्रिल महिन्यात मी राज्याचा दौरा करणार आहे यावेळी सगळ्यांशी भेट होईलच पण मुंबई, ठाण्याचा आढावाही मागवला आहे. निवडणुकात काय झाले,काय काय चालले याची संपूर्ण माहिती आहे. त्यामुळे गाफिल राहु नका की मला काहीच माहिती नाही. निवडणुकीच्या काळात अनेक ठिकाणी पैश्यांचे व्यवहार झाले. पण पक्षाशी झालेली गद्दारी सहन करणार नाही अशा बंडखोरांचा समाचार लवकरच घेईल असा इशारा राज यांनी बंडखोरांना दिला. मला या निवडणुकीत खूप काही शिकायला मिळाले येत्या 2014 च्या निवडणुकीत किती शिकलो हे सगळ्यांना कळेच पण मनसेनं कमी वेळात मोठी झेप घेतली याचा अभिमान आहे त्याबद्दल पक्षावर प्रेम करणार्‍या सर्व कार्यकर्त्यांना माझा सलाम आहे पुढेही असेच काम करु असा विश्वास राज यांनी व्यक्त केला. तसेच पुण्यात विरोधी पक्षाच्या बाकावर बसलो आता नाशिकमध्ये मनसेचाच महापौर होणार असा दावाही राज यांनी केला. मनसेनं कमी कालावधीत मोठी मजल मारल्याचं सांगितलं. आणि माझ्यावर टीका करण्यांचीच झोप उडालीय, असं म्हणत शरद पवारांनी टोला हाणला. त्याचबरोबर ऐन निवडणुकीच्या काळात यांनी मैत्री कशी आठवते तुमचे संबंध बाहेर येतात नेमक याचवेळी कसे येतात असा टोलाही राज यांनी लगावला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close