S M L
  • टीबी हॉस्पिटलच पोहचले 'लास्ट स्टेज'ला !

    Published On: Mar 3, 2012 04:51 PM IST | Updated On: Mar 3, 2012 04:51 PM IST

    अलका धुपकर, मुंबई03 मार्चटीबी निर्मूलनाचा नवा कार्यक्रम महानगरपालिकेने नुकताच जाहीर केला. महापालिकेच्या स्वत:च्या बजेटव्यतिरीक्त शासनाकडून तब्बल 33 कोटींचा निधी टीबी निर्मूलनासाठी मिळतो. पण मुंबईतल्या एक हजार खाटांच्या या टीबी हॉस्पिटलची अवस्था भयंकर आहे. कचर्‍याचे ढिगार्‍यात बुडालेली ही हॉस्पिटलची मागील बाजू..ज्या वॉर्डमध्ये टीबीचे पेशंट उपचार घेत आहेत त्याच वॉर्डच्या मागची ही बाजू आहे. हॉस्पिटलची सरंक्षक भिंत ही तर अतिक्रमणमुळे भरुन गेलीय. इथल्या पिण्याच्या पाण्यालाही गटाराची दुर्गंधी येते. मेडिकल वेस्टच्या कचराकुंड्या ओसंडून जातायत. त्यामुळे हॉस्पिटल भटक्या कुत्र्यांचं घर बनलं आहे. आणि हॉस्पिटलचे कूलूपबंद असणारे चार वॉर्ड बंद पडली आहे. त्यात भरातभर हॉस्पिटलमधल्या लिफ्ट्स बंद पडल्या आहे. आणि चालता न येणार्‍या पेशंट्साठी बांधलेल्या या वॉर्डसचं रुपांतर मात्र भूतबंगल्यात झालंय. टीबी पेशंटचे कपडे धुण्यासाठीचा बॉयलरही अनेक वर्ष बंद पडला. मनीषा म्हैसकर यांनी मात्र टीबी हॉस्पिटलची जबाबदारी ही कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बांदिवडेकर यांच्याकडे असल्याचं सांगितलं. पण डॉ. बांदिवडेकर यांच्यासारख्या प्रशासकीय अधिकार्‍यांना हॉस्पिटलच्या वस्तुस्थिबद्दल कुठलीच माहिती नव्हती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close