शं. ना. नवरे गदिमा पुरस्काराने सन्मानित

शं. ना. नवरे गदिमा पुरस्काराने सन्मानित

15 डिसेंबर, पुणे यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक शं.ना. नवरे यांना देण्यात आला. गदिमा स्मृती प्रतिष्ठानतर्फे पुण्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 14 डिसेंबर हा दिवस गीतरामायणकार ग.दि.माडगूळकर यांचा स्मृतिदिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने पुण्यात गदिमा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. यंदाच्या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि तसंच ज्येष्ठ साहित्यिक द.मा. मिरासदार उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिक द.मा. मिरासदार कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. गदिमा स्नेहबंध पुरस्कार उल्हास पवार यांना तर गृहिणी - सखी - सचिव पुरस्कार दिवंगत लेखक शिवाजीराव सांवत यांच्या पत्नी मृणालिनी सावंत यांना देण्यात आला. चैत्रबन पुरस्काराने सुधीर गाडगीळ यांना सन्मानित करण्यात आलं. यावेळी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. मनमुराद शाब्दीक फटकेबाजी करत, उपस्थित पुणेकरांना खळखळून हसवलं.

  • Share this:

First published: December 15, 2008, 4:19 AM IST
Tags:

ताज्या बातम्या