10 सप्टेंबरगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या घरी गणरायाचं दर्शन घेण्यासाठी आज सोनी टीव्हीवरच्या सीआयडी सीरियलमधले कलाकार लतादीदींच्या घरी आले होते. यावेळी या कलाकारांनी गणरायाची पूजा केली. तसेच लतादीदींशी मनमोकळा संवाद साधला. लतादीदींनीही यावेळी या कलाकारांचं कौतुक केलं. आपल्याला सीआयडी हा कार्यक्रम खूप आवडतो आणि तो मी आर्वजून पाहते असं यावेळी लतादीदींनी सांगितलं. आपल्याला मोदक खूप आवडतात आणि गणेशोत्सव हा माझा आवडता सण आहे असंही लतादीदींनी यावेळी सांगितलं.